शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७८% खेडी मूलभूत सुविधांपासून वंचित; कुठे नाहीत रस्ते तर कुठे पाेहाेचली नाही वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 08:32 IST

‘विकास’ आलाच नाही गावात, पाण्यासाठीही वणवण

-अविनाश साबापुरेयवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून सर्वच सरकारांकडून विकासाचे दावे केले जात आहेत. मात्र, स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही महाराष्ट्रातील तब्बल ७८ टक्के खेडी मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर अहवाल पुढे आला आहे. राज्यातील साडेतीनशे तालुक्यांमधील गावनिहाय परिस्थितीवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला असून, त्यात शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, सिंचन, रेशन अशा विविध पातळीवरील आबाळ पुढे आणली गेली आहे. 

केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा आधार घेत बंगळुरू  येथील अझीम प्रेमजी विद्यापीठाने हा अहवाल तयार केला आहे. यात देशातील साडेसहा लाख खेड्यांचा अभ्यास करण्यात आला. संपूर्ण देशातच खेड्यांची अवस्था वाईट असून, महाराष्ट्रातही खडतर परिस्थिती आहे. सिंचनापासून आरोग्यापर्यंत १३ निकषांवर या अहवालात खेड्यांच्या मागासलेपणाचा निर्देशांक निश्चित केला गेला. त्यात किमान पाच निकषही पूर्ण करू न शकलेल्या खेड्यांची संख्या ७८ टक्के आहे. त्यांना अतिमागास ठरविले गेले, तर सहा हजार ५०० खेड्यांत यातील ११ निकषही पूर्ण होत नसल्याचे दिसून आले. 

    घरात आधुनिक स्वच्छतागृह नाही    ७०%    गावात ब्राॅडबँड, इंटरनेट नाही    ६६%    १० किमीत रोजगार शिक्षण केंद्र नाही    ५३%    कमी वजनाची मुले आढळतात    ४९%    गावातील अंतर्गत रस्ते पक्के नाहीत    ४५%    गावाला जोडणारा बारमाही रस्ता नाही    ३७%    गावात एक तरी मूल शाळाबाह्य आहे     ३६%     कुपोषित स्तनदा माता आढळतात    ३५%    १० किमी अंतरात एटीएम नाही    ३१%    सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही    २८%    कुपोषित तरुण मुली आढळतात    २७%    १० किमी अंतरात एकही बँक नाही    २५%    १० किमी अंतरात बाजारपेठ नाही    २२%    गावात एसटी नाही, वाहतूक सेवा नाही    २०%    सिंचनाची सुविधा नसलेली गावे    १८%    १० किमी अंतरात रेशन दुकान नाही    १६%    गावात मोबाइल किंवा फोन नाही    १६%    १० किमी अंतरात आरोग्य केंद्र नाही    १६%    एकही अंगणवाडी केंद्र नाही    ११%    एकाही घरात नळजोडणी नाही    ६%    एकाही घरी वीज जोडणी नाही    ५%    १० किमी अंतरात प्राथमिक शाळा नाही    ३%

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र