76 coaching classes on the radar | ७६ कोचिंग क्लासेस रडारवर
७६ कोचिंग क्लासेस रडारवर

ठळक मुद्देसंडे अँकर । सुरत घटनेनंतर यवतमाळ पालिकेला फायर आॅडिटची जाग

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुजरातमधील सुरत येथे कोचिंग क्लासेसला नुकत्याच लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर जाग आलेल्या महाराष्ट्र शासनाने सर्वच नगरपरिषदांना फायर आॅडिट करण्याचे आदेश दिले. यवतमाळातील ७६ कोचिंग क्लासेस व शाळा, महाविद्यालये पालिकेच्या रडारवर आहे.
नगररचना विभागातूनच इमारत बांधकाम परवानगी देताना सुरक्षिततेच्या मानकांचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र प्रचंड गर्दी असलेल्या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये आकस्मिक स्थितीसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नसते. अशीच स्थिती शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांची आहे. याशिवाय जागा मिळेल तिथे खासगी रुग्णालये थाटण्यात आली आहेत. या सर्व इमारतींचा नगरपरिषद अग्नीशमन विभागाने सर्वे केला असून पहिल्या टप्प्यात खासगी कोचिंग क्लासेस व शाळा, महाविद्यालयांना फायर सुविधा तत्काळ उपलब्ध करून घ्याव्यात, असे निर्देश दिले आहे.
अनेक खासगी रुग्णालये धोकादायक इमारतीत व कोंदट ठिकाणी सुरू आहेत. यासह काही नवीन हॉस्पिटलमध्येही सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध नाहीत.

सुविधा न दिल्यास थेट सील ठोकणार
कोचिंग क्लासेसमध्ये फायर सुविधा करण्यासाठी सोमवारी ७६ संस्थांना नोटीस दिली जाणार आहे. ठराविक कालावधीत अग्नी सुरक्षेची व्यवस्था न केल्यास या संस्थांना थेट सील ठोकून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरातील खासगी रुग्णालयांचेही फायर आॅडिट झाले की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.


Web Title: 76 coaching classes on the radar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.