शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल हायवेसाठी ७४५ हेक्टर जमीन अधिग्रहण

By admin | Updated: July 29, 2016 02:16 IST

जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी ७४५ हेक्टर जमीन अधिग्रहित केली ...

डिसेंबरपर्यंत प्रक्रिया : जिल्ह्यात १५३ किमींचा चौपदरी सिमेंट रस्ता सुरेंद्र राऊत यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी ७४५ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. जिल्ह्यात १५३ किलोमीटरचा चौपदरी सिमेंट रस्ता तयार केला जाणार असून जिल्ह्याच्या विकासाचा महामार्ग यामुळे खुला होणार आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ जिल्ह्यातील ६४ गावांमधून जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून (नाही) भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाकडूनही या महामार्गाच्या अनुषंगाने सातत्याने आढावा घेतला जात आहे. २२ जुलै रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे या महामार्गाचा आढावा घेतला. यावेळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, बांधकाम विभागातील सर्व वरिष्ठ सचिव उपस्थित होते. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा वरिष्ठ पातळीवरूनच सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी नोव्हेंबर २०१५ मध्येच अधिग्रहणासंदर्भात प्रसिद्धी देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हे काम अनेक दिवस थंडबस्त्यात होते. या संदर्भात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. आता थेट केंद्राकडूनच याचा फॉलोअप घेण्यात येत आहे. दरदिवशीची प्रगती काय याची विचारणा होत असल्याने डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याला गती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कायद्यातील १९५६ च्या तरतुदीनुसार भूसंपादनाची प्रक्रिया करण्यासाठी दोन वर्षाचा मर्यादित कालावधी आहे. भविष्यात हा मार्ग बुटीबोरी ते रत्नागिरीपर्यंत जोडण्यात येणार आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाच्या देखभालीचे नो-टेंशन सिमेंट रस्ता होत असल्याने किमान ५० वर्षापर्यंत त्याच्या देखभाल दुरुस्तीची गरज भासणार नाही. या महामार्गामुळे राज्य सरकारला केवळ ग्रामीण रस्त्यांवरच लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. थेट केंद्रातून निधी मिळत असून पहिल्या टप्प्यातील दहा हजार कोटींचा निधी खर्चाचे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असून शेतकऱ्यांकडूनही सहकार्य मिळत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी सहनियंत्रक म्हणून भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे रेल्वे मार्गाच्याही भूसंपादनाची जबाबदारी आहे. - सचिंद्र प्रताप सिंह जिल्हाधिकारी, यवतमाळ भूसंपादनासाठी यवतमाळ, राळेगाव, उमरखेड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकरण म्हणून अधिकार देण्यात आले आहे. आतापर्यंत ४० गावांच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये कलम ३ (अ) ची प्राथमिक अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी प्रथमच आॅनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. - विजय भाकरे सहनियंत्रक, राष्ट्रीय महामार्ग