शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

६४ लाख पेन्शनर्सची केवळ ११७० रुपयांत बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:01 IST

पेन्शनवाढीच्या मुद्द्यावर हैदराबाद येथील ‘सीबीटी’च्या बैठकीत न्याय देऊ असे आश्वासन दिल्यावरही श्रम मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी बगल दिल्याचा आरोप राष्ट्रीय संघर्ष समितीने केला आहे.

ठळक मुद्देप्रश्न ‘ईपीएफ-९५’ वाढीचाहैदराबादच्या सीबीटीनेही वाढीचा मुद्दा टाळला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ईपीएफ-९५ योजनेच्या पेन्शनर्स मंडळीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान २७८५ इतके मासिक निवृत्तिवेतन मिळणे आवश्यक आहे. मात्र केंद्रीय श्रम मंत्रालयाने देशातील ६४ लाख ९३ हजार ९२३ निवृत्तांना मासिक केवळ ११७० रुपये देऊन बोळवण केल्याची बाब समोर आली आहे. पेन्शनवाढीच्या मुद्द्यावर हैदराबाद येथील ‘सीबीटी’च्या बैठकीत न्याय देऊ असे आश्वासन दिल्यावरही श्रम मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी बगल दिल्याचा आरोप राष्ट्रीय संघर्ष समितीने केला आहे.केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सेंट्रल बोर्ड आॅफ ट्रस्टीची (सीबीटी) बैठक २२ आॅगस्ट रोजी हैदराबाद येथे झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून किमान पेन्शन वाढीच्या मागणीसाठी पेन्शनर्सचा संघर्ष सुरू आहे. या मागणीबाबत सीबीटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. मात्र बैठकीत या मुद्द्याचा उल्लेखही झाला नाही, असा आरोप संघर्ष समितीने केला आहे. १० जुलै रोजी खासदार डॉ. आर. लक्ष्मण यांनी लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सीबीटीच्या बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात बैठकीत पेन्शनर्सची निराशा झाली. उलट या बैठकीत प्रश्न मांडण्यासाठी गेलेल्या निवृत्तांना पोलीस यंत्रणेचा वापर करून बाजूला करण्यात आल्याबाबत राष्ट्रीय संघर्ष समितीचे न्यायिक सल्लागार कविश डांगे यांनी खंत व्यक्त केली.किमान ७ हजार ५०० इतके पेन्शन द्यावे, ३१ जुलै २०१७ चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्यात यावे या संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या आहेत. मात्र या महत्त्वाच्या मागण्यांचा सीबीटीमध्ये विचारच करण्यात आला नाही. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील निर्णयानुसार किमान २७८५ इतकी पेन्शन देणे आवश्यक आहे. मात्र मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार, देशातील ६४ लाख ९३ हजार ९२३ पेन्शनर्सला जून महिन्याचे पेन्शन म्हणून ७५९ कोटी ७८ लाख ३३ हजार ७५८ रुपये अदा करण्यात आले. म्हणजे प्रत्येकी सरासरी ११७० रुपये पेन्शन देण्यात आले. हा अन्याय आहे. आता नांदेड येथे २५ आॅगस्ट रोजी पेन्शनर्सचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार असल्याची माहिती डांगे यांनी दिली.श्रम मंत्र्यांनी शब्द पाळला नाही. सूटप्राप्त कंपन्या आणि सूट प्राप्त नसलेल्या असे वर्गीकरण करणारे ३१ जुलैचे परिपत्रक रद्द करावे, ही आमची प्रमुख मागणी सरकारने दुर्लक्षित केली आहे. हैदराबादच्या बैठकीतही निवृत्तांना अवमानकारक वागणूक देण्यात आली. त्याचा निषेध असो.- अ‍ॅड. कविश डांगे, न्यायिक सल्लागार, राष्ट्रीय संघर्ष समितीवाढीच्या प्रतीक्षेत महाराष्ट्रातील सर्वाधिक पेन्शनर्सईपीएस-९५ योजनेचे सर्वाधिक पेन्शनर्स महाराष्ट्रात ११ लाख २ हजार ६७७ इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत. हे सर्व जण पेन्शनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूत ७ लाख ३७ हजार ४३१, पश्चिम बंगालमध्ये ५ लाख ७२ हजार ४७७, कर्नाटकमध्ये ५ लाख ३६ हजार ४९१, तर उत्तर प्रदेशात ५ लाख ९ हजार २२० पेन्शनर्स आहेत. केरळ ४०४१०३, गुजरात ३९४४१३, तेलंगणा ३६२७६४, आंध्र प्रदेश २७३५२३, मध्य प्रदेश २१२७२७, बिहार १९२५३९, राजस्थान १६४१८२, ओडिशा १६२४३८, झारखंड १५०२१४, हरियाणा १४२७२३, दिल्ली १३८६९३, पंजाब १०६९९८, छत्तीसगड ८७७७१, उत्तराखंड ५८९०२, आसाम ५०८५९, चंदीगड ४२०१०, हिमाचल प्रदेश ३४०२७, गोवा २४७९२, पाँडेचेरी १६३०३, त्रिपुरा ७७७७, मेघालय ४५०८, अंदमान निकोबार ३४३३ असे देशभरात एकूण ६४ लाख ९३ हजार ९२३ पेन्शनर्स वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Governmentसरकार