शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२० तक्रारी

By admin | Updated: May 23, 2015 00:22 IST

पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ उपविभागीय जनता दरबारात ६२० तक्रारी दाखल झाल्या.

थेट संवाद : सर्वाधिक तक्रारी भूमिअभिलेखच्या यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ उपविभागीय जनता दरबारात ६२० तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारकर्त्याशी थेट संवाद साधत या तक्रारी तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात शुक्रवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते. सकाळी जनता दरबाराला प्रारंभ झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रत्येक तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना केल्या. सर्वाधिक ६७ तक्रारी भूमिअभिलेख विभागाच्या होत्या. अनेक दिवसांपासून या विभागाची प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष अदालती घेण्याची सूचना केली. बहुतांश तक्रारी फेरफार वेळेवर मिळत नसल्याच्या होत्या. राजेश लुटे, दिनकर तोडे, छाया टोंगे, अमर काबरा या व्यक्तींचा प्रामुख्याने तक्रारकर्त्यांमध्ये समावेश होता. यासोबतच तहसील कार्यालयाशी संबंधित ५६, पंचायत समिती ४१, जिल्हा परिषद २७, सामाजिक न्याय विभाग १५ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित ३० तक्रारींचा समावेश होता. या सोबतच जीवन प्राधिकरण, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, बांधकाम, पुनर्वसन, परिवहन, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य वने आदी विविध विभागांच्या तक्रारींचा समावेश होता. (शहर वार्ताहर)