शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

६१ हजार आदिवासींचे वनहक्क धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:07 IST

ज्यांचे वनहक्क दावे अंतिमत: रद्द झालेले आहेत, अशा आदिवासींना वनजमिनीवरून हुसकावून लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयालयाने दिले आहेत. या आदेशाचा फटका २२ हजार आदिवासींना बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबिरसा क्रांतीदलाचे निरीक्षणगावस्तरीय समित्यांचा अधिकाऱ्यांकडून गैरवापर झाल्याचा आरोप

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्यांचे वनहक्क दावे अंतिमत: रद्द झालेले आहेत, अशा आदिवासींना वनजमिनीवरून हुसकावून लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयालयाने दिले आहेत. या आदेशाचा फटका २२ हजार आदिवासींना बसण्याची शक्यता आहे. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी गावस्तरीय वनहक्क समित्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून ३१ जानेवारीपर्यंत तब्बल ६१ हजार ६४८ दावे प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन शासन ६० हजारांपेक्षा अधिक आदिवासी कुटुंबांना निर्वासित करणार असल्याची भीती आदिवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील १३ हजार ७१२ आदिवासी आणि ८ हजार ७८७ पारंपरिक वननिवासी असे एकंदर २२ हजार ४९९ कुटुंबे प्रभावित होणार आहेत. मात्र, वनविभाग व प्रशासनातील अधिकारी वनहक्क समित्यांचा गैरवापर करून याहून अधिक कुटुंबांना विस्थापित करणार असल्याची तक्रार आदिवासी बांधवांनी केली आहे. याबाबत बिरसा क्रांतिदलाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पाठविली आहे.वनहक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी २६ जिल्ह्यात गावपातळीवर १५ हजार २ वनहक्क समित्या तयार करण्यात आल्या आहेत. सोबतच ९४ उपविभागीय समित्या, २६ जिल्हास्तरीय वनहक्क समित्या स्थापन केल्या आहे. त्यानुसार ३१ जानेवारी २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील ग्रामसभांकडे आदिवासींचे एकूण २ लाख ६५ हजार २६ वनहक्क दावे प्राप्त झाले आहेत. त्यात २ लाख ५७ हजार ११८ इतके वैयक्तिक दावे व ७ हजार ९०८ सामूहिक दावे आहेत.त्यापैकी उपविभागीय समितीने २ लाख ७ हजार १२१ वैयक्तिक दावे व ५ हजार ९०१ सामूहिक असे एकूण २ लाख १३ हजार २२ दावे जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. जिल्हास्तरीय समितीने वैयक्तिक १ लाख ५६ हजार १९ व सामूहिक ५ हजार ३४२ असे एकूण १ लाख ६१ हजार ३१६ दावे मान्य केले आहेत. तर वैयक्तिक २६ हजार ९४८ व सामूहिक १८३ असे एकूण २७ हजार १३१ दावे नाकारले आहेत.तर दुसरीकडे ग्रामसभा, उपविभागीय समिती, जिल्हास्तरीय समितीकडे आदिवासींचे एकूण ३४ हजार ५१७ वनहक्क दावे प्रलंबित आहेत. यात ३२ हजार ८३९ वैयक्तिक व १ हजार ६७८ सामूहिक दाव्यांचा समावेश आहे. याशिवाय दावेदारांकडे परत केलेले १३ हजार ७०९ दावेही प्रलंबित आहेत. भविष्यात हे सर्व दावे नाकारले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूण ६१ हजार ६४८ आदिवासी कुटुंबांना वनजमिनीवरून हुसकावून लावले जाणार.ग्रामसभांचे चौकशी अहवाल नजरेआडवनदावे नाकारताना ग्रामसभा या प्राधिकरणाचे व वनहक्क समितीचे सर्व अधिकार अर्जावर सही करण्याखेरीज शासकीय अधिकाºयांनीच वापरल्याचा आरोप बिरसाक्रांती दलाने केला आहे. कोरम पूर्ण नसतानाही ग्रामसभा गठीत केल्या. सर्व पेसा गावात ग्रामसभा गठीत करण्याची तरतूद सरकारने पाळलेली नाही. उपविभागस्तरीय समितीने वन व महसूल नकाशेही ग्रामसभांना दिलेले नाहीत. उपविभागस्तरीय, जिल्हास्तरीय समितीने ग्रामसभा स्तरावरील चौकशी अहवाल तपासलेले नाहीत. उपविभाग, जिल्हा व राज्य स्तरीय सनियंत्रण समिती यांनी विहित कार्यपद्धतीने काम केलेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दावे प्रलंबित ठेवण्यात आले किंवा रद्द करण्यात आले, असा आरोप बिरसा क्रांतिदलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी केला आहे.आदिवासींच्या वनहक्काबाबत अध्यादेश काढावनहक्क दावे नाकारताना स्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरली आहे की नाही, हे तापसल्याविना शासनाला प्रशासकीय कारवाई करता येणार नाही. त्यामुळे वनाधिकार अधिनियम २००६ च्या कलम सहामध्ये वनहक्क विहीत करण्याची जी कार्यपद्धती निश्चित केली आहे, त्याची पुनर्समीक्षा करण्यासाठी अध्यादेश काढणे आवश्यक आहे. आदिवासी बांधवांचे वनहक्क वाचविण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी बिरसा क्रांतीदलाने केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार