शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

५४ लाख सेवानिवृत्तांना मिळते केवळ अडीच हजार निवृत्तीवेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:01 IST

जेथे सामान्य कुटुंबाचा महिनाभराचा भाजीपाला हजार रुपयांच्या वर जातो, तेथे ‘इपीएस-९५’च्या सेवानिवृत्तांना केवळ अडीच हजार रुपयांमध्ये महिना काढावा लागतो.

ठळक मुद्दे‘इपीएस’चे लाभार्थी विद्युत कंपनी, एसटी, बँकांचे कामगार

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जेथे सामान्य कुटुंबाचा महिनाभराचा भाजीपाला हजार रुपयांच्या वर जातो, तेथे ‘इपीएस-९५’च्या सेवानिवृत्तांना केवळ अडीच हजार रुपयांमध्ये महिना काढावा लागतो. सुमारे ५४ लाख कामगारांना या दिव्यातून जावे लागत आहे. विद्युत कंपनी, एसटी महामंडळ, सहकारी बँका अशा १८६ संस्थांचे सेवानिवृत्त कामगार जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी तरी सुखाचे दोन घास पोटात जावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.‘इपीएस-९५’ (एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन) अंतर्गत देशभरातील १८६ संस्थामधील कामगारांना पेन्शनचा लाभ दिला जातो.कार्यरत असताना वेतनातून कपात केलेल्या काही रकमेवर सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. कमीत कमी एक हजार आणि जास्तीत जास्त अडीच हजार रुपये एवढी रक्कम या सेवानिवृत्तांच्या हाती पडते. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या लाभाची इतर रक्कम विविध कारणांवर खर्ची पडलेली असते. अशावेळी निवृत्तीवेतन हाच एक मोठा आधार असतो. पण त्यातून भागत नाही, ही वास्तविकता आहे.केंद्र सरकारकडे ‘इपीएस-९५’ अंतर्गत तीन लाख २२ हजार कोटी रुपये जमा आहे. त्यावर वर्षाला १९ हजार कोटी रुपये व्याज मिळते. सेवानिवृत्तांना मात्र कवेळ सात हजार कोटी रुपये वितरित केले जातात. १२ हजार कोटी शिल्लक राहते, अशी माहिती माहितीच्या अधिकारात अखिल भारतीय संघटनेला उपलब्ध करून देण्यात आली आहे.१२ कोटी रुपये शिल्लक राहात असताना पेन्शन का वाढवून दिली जात नाही, असा कामगारांचा प्रश्न आहे. ही रक्कम इतरत्र गुंतविली नसावी, अशी साधार शंका उपस्थित केली जात आहे.विद्युत कंपनी, एसटी महामंडळ, सहकारी बँका, बीडी कामगार, साखर कारखाना, सहकार आदी क्षेत्रातील कार्यरत आणि सेवानिवृत्त कामगारांनी पेन्शन वाढीसाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहे. अखिल भारतीय संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे सभा बोलाविली होती. १५ ते २० हजार कामगार यावेळी उपस्थित होते. पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील कामगारांनी या बैठकीला हजेरी लावली होती.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण यावेळी करून देण्यात आली. सत्तेत आल्यास ९० दिवसात पेन्शन वाढवून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र पेन्शनमध्ये वाढ झाली नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ७५०० रुपये बेसिक आणि त्यावर महागाई भत्ता मिळावा, अशी या कामगारांची अपेक्षा आहे. याच माध्यमातून या कामगारांनी सरकारला ‘दम’ भरला आहे. अडीच हजार रुपयांत घरखर्च भागवायचा कसा, हा त्यांचा प्रश्न आहे.‘इपीएस-९५’ अंतर्गत देशभरात कार्यरत आणि सेवानिवृत्त असे ६६ लाख कामगार आहेत. मिळणाऱ्या पेन्शनमधून कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी पेन्शन वाढ द्यावी. खोटे आश्वासन देणे थांबवावे.- भास्कर भानारकर, अमरावती प्रदेश सचिव, एसटी परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना

टॅग्स :Governmentसरकार