शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या १७ लाखाने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गत ५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या पावणे तीन पटीने वाढली आहे. पूर्वी १० लाख असलेली ...

ठळक मुद्दे४८ टक्के नागरिकांवर ५२ टक्के नागरिकांचा भार : जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न केवळ १८१ रूपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत ५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या पावणे तीन पटीने वाढली आहे. पूर्वी १० लाख असलेली लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २७ लाख झाली आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येत १७ लाख वाढ नोंदविण्यात आली आहे. लोकसंख्या वाढत असली तरी निम्मे लोक कामकाज करतात आणि निम्मे लोक त्यावर विसंबून आहेत. वाढत्या गरजांच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न मात्र कमी आहे. यामुळे बहुतांश कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा आहे.१९६१ केंद्र शासनाने जिल्ह्याची जनगणना केली, त्यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ९८ हजार ४७० होती. त्यावेळी लोकसंख्येचा दशवार्षिक वृध्दीदर १७.८६ होता. त्यावेळी ग्रामीण भागात नऊ लाख ५९ हजार ९४५ नागरिक राहत होते. तर एक लाख ३८ हजार ५२५ नागरिकांचा भार शहरावर होता. ५० वर्षापूर्वीपासून शहर आणि ग्रामीण भागात विकासाची स्पर्धा होती. प्रारंभी काही वर्षे ग्रामीण भागाकडे नागरिकांचा ओढा होता. यानंतरच्या कालखंडात शहरातील विकास कामांची गती वाढत गेली. तसतसा शहराकडे जाणारा नागरिकांचा लोंढा वाढत गेला.गत वर्षामध्ये जिल्ह्यात लोकसंख्येचा वृध्दीदर सतत वाढत राहिला आहे. रोजगाराच्या संधी शोधत काही नागरिक शहरात वास्तव्याला आले आहे. यामुळे शहराची लोकसंख्या वाढत गेली आहे. २०११ मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय जनगणना पूर्ण केली. या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २७ लाख ७२ हजार ३४८ झाली आहे. एकूण लोक संख्येच्या ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्याला आहे. तर तीस टक्के नागरिक शहरात वास्तव्याला आहे. २१ लाख ७२ हजार ३४८ लोक ग्रामीण भागात राहतात. तर पाच लाख ९८ हजार १५३ नागरिक शहरात राहतात. सध्याचा लोकसंख्येचा वृध्दीदर १२.७८ पर्यंत खाली आला आहे. परंतु ५० वर्षांचा तुलनात्मक अभ्यास केला तर ५० वर्षापूर्वी एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक शहरात राहत होते. आता हा आकडा ३० टक्क्यांवर आला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे.शिक्षण, रोजगार आणि सोई सुविधा यामुळे शहरी भागात लोकसंख्या वर्षागणिक वाढत आहे. शहराचा भूभागही वाढत आहे. याशिवाय गावाची लोकसंख्या कमी होत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत रोजगारामध्ये पाहिजे तशी वाढ झाली नाही. याचे कारणही तसेच आहे.जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न १८२ रूपयेअंकेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न १८२ रूपये आहे. हातात पडणारे हे उत्पन्न कुटुंबासाठी अपुरे आहे. यामुळे कृषीसह इतर क्षेत्रात कर्ज घेऊन उद्योग उभारण्यासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळतात.स्त्री पुरूष असमानता कायमचजिल्ह्याच्या दरहजारी स्त्री पुरूष गणनेचा विचार केला तर जिल्ह्यात सरासरी दरहजारी पुरूषामागे ९५२ स्त्रिया आहेत. ग्रामीण भागामध्ये दर हजारी पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण ९५० आहे. तर शहरी भागात दर हजारी पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण ९६२ आहे.