शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

यवतमाळ जिल्ह्यात आठ मृत्युसह 425 जण पॉझिटिव्ह; 380 कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 18:30 IST

रविवारी एकूण 4069 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 425 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3644 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात आठ मृत्युसह 425 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 380 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 52 व 62 वर्षीय पुरुष आणि 56 व 76 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 50 वर्षीय महिला आणि तालुक्यातील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 425 जणांमध्ये 290 पुरुष आणि 135 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 160 जण पॉझेटिव्ह, उमरखेड 69, पांढरकवडा 29, आर्णि 23, पुसद 22, नेर 21, दिग्रस 17, वणी 16, घाटंजी 14, बाभुळगाव 11, महागाव 11, राळेगाव 8, मारेगाव 7, झरीजामणी 7, दारव्हा 5, कळंब 3 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

रविवारी एकूण 4069 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 425 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3644 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3173 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1463 तर गृह विलगीकरणात 1710 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 30651 झाली आहे. 24 तासात 325 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 26794 आहे. तर जिल्ह्यात एकूण 684 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.75 असून मृत्युदर 2.23 आहे.सुरवातीपासून आतापर्यंत 285160 नमुने पाठविले असून यापैकी 283050 प्राप्त तर 2110 अप्राप्त आहेत. तसेच 252399 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ