एकाच दिवशी ४२३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:00 AM2020-09-12T05:00:00+5:302020-09-12T05:00:20+5:30

कोरोनावर मात केलेल्या २०८ रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२१० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ३२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५,२४७ झाली आहे. यापैकी ३,५७२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १४३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३२७ जण भरती आहे.

423 corona positive on the same day | एकाच दिवशी ४२३ कोरोना पॉझिटिव्ह

एकाच दिवशी ४२३ कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देरुग्णसंख्येचा उच्चांक : पाच जणांचा मृत्यू, पुसदमध्ये सर्वाधिक ९१ तर यवतमाळात ७१ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वेगाने वाढत असून शुक्रवारी दिवसभरात ४२३ पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली. ही आजपर्यंतची एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १४३ झाली आहे.
शुक्रवारी मृत झालेल्या पाच जणांमध्ये पांढरकवडा शहरातील ४० वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला, उमरखेड शहरातील ६५ वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ४९ वर्षीय पुरुष आणि आर्णी तालुक्यातील ८४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या ४२३ जणांमध्ये २५२ पुरुष व १७१ महिला आहेत. यात आर्णी शहरातील १७ पुरूष व सात महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, बाभूळगाव शहरातील पाच पुरूष व सात महिला, दारव्हा शहरातील सहा पुरूष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील सहा पुरूष, दिग्रस शहरातील १२ पुरुष व १६ महिला, दिग्रस तालुक्यातील तीन पुरूष, घाटंजी शहरातील नऊ पुरूष व १५ महिला, घाटंजी तालुक्यातील एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरूष, केळापूर तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील १६ पुरूष व ११ महिला, महागाव तालुक्यातील १७ पुरूष व सहा महिला, मारेगाव शहरातील दोन पुरूष व चार महिला, नेर शहरातील तीन पुरुष व चार महिला, नेर तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील आठ पुरुष व पाच महिला, पुसद शहरातील ५३ पुरूष व ३७ महिला, पुसद तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील १९ पुरुष व ११ महिला, वणी शहरातील १६ पुरुष व १५ महिला, वणी तालुक्यातील तीन पुरूष, वर्धा शहरातील एक पुरूष, यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व २१ महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व एक महिला, झरीजामणी शहरातील एक पुरूष व तीन महिला, झरीजामणी तालुक्यातील दोन पुरूषांचा समावेश आहे.
कोरोनावर मात केलेल्या २०८ रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२१० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ३२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५,२४७ झाली आहे. यापैकी ३,५७२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १४३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३२७ जण भरती आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी २८० नमुने तपासणीकरिता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ६०,१६७ नमुने पाठविले असून यापैकी ५७,३५३ प्राप्त तर २८१४ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच ५२,१०६ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

नेरमध्ये कोरोनाने तिसऱ्याही भावाचा मृत्यू
नेर : कोरोनाचा नेर तालुक्यात कहर झाला आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असतानाच मृत्यू संख्येचा आलेखही वर सरकत आहे. येथील एका कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी याच कुटुंबातील तिसरा ७१ वर्षीय भाऊसुद्धा कोरोनाचा बळी ठरला आहे. अजूनही या कुटुंबातील पाच जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. मेनलाईन परिसरातील हे कुटुंब आहे. नेर शहरात कोरोना बाधितांचा आकडा २२६ वर पोहोचला आहे. सध्या ३६ जण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तालुक्यात कोरोनाबळींची संख्या सहा झाली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी तालुका प्रशासन, नगरपालिका व पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे.
 

Web Title: 423 corona positive on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.