शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर धरणात ३२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:51 IST

तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देतलावही अर्ध्यावरच : बुलडाणा जिल्ह्यातील अत्यल्प पावसाचा विपरित परिणाम

राजाभाऊ बेदरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर धरण बांधण्यात आले. जून महिन्याच्या मध्यापासून पावसाने दडी मारल्याने या धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. नंतर जुलैमध्ये बºयापैकी पाऊस झाल्याने धरणात थोडा पाणीसाठा झाला. आता गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धरण भरण्यास विलंब होत आहे. या धरणाच्या कालव्यावरून पुसद, उमरखेड तालुक्यातील शेतीचे सिंचन केले जाते. मात्र अद्याप धरण पूर्णपणे भरले नसल्याने खरीप पिकांच्या सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.उमरखेड तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ३८४ मिमी पाऊस झाला. इसापूर धरण क्षेत्रात ५९५ मिमी पावसाची नोंद झाली. तरीही धरण भरले नाही. हीच गत तालुक्यातील आठ लघु सिंचन प्रकल्पांची आहे. दराटी येथील तलाव ४३ टक्के, मरसूळ ४२, अंबोना ५२ टक्के भरला आहे. तरोडा आणि पोफाळी तलाव मात्र १०० टक्के भरले असून निंगनूर तलावातही ९६ टक्के पाणीसाठा आहे. पिरंजी तलाव ३६ टक्के भरला आहे. इसापूर व इतर लघु प्रकल्प पूर्णपणे भरले नसल्याने शेतकºयांसमोर खरिपाची चिंता आहे.रबीला पाणी देणारपुरेशा पाणीसाठ्याअभावी इसापूर धरणातून खरीप पिकाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. तथापि, रबी पिकांसाठी धरणातून चार ते पाचदा पाणी सोडले जाणार असल्याची माहिती आहे. इसापूर प्रकल्प २ चे अभियंता आर.एस. माने यांनी याला दुजोरा दिला आहे. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे इसापूर धरणात केवळ ३२ टक्के जलसाठा असल्याची माहिती माने यांनी दिली.

टॅग्स :Damधरण