शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
3
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
4
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
5
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
6
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
7
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
8
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
9
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
10
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
11
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
12
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
13
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
14
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
15
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
16
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
17
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
18
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
19
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
20
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...

३१९१ कोटींचा तोट्याचा सौदा ! फडणवीसांनी चौकशीचे आदेश द्यावेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:19 IST

कंत्राटदार जिंकले, एसटी हरली : वारंवार दिली जात आहे मुदतवाढ

विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इलेक्ट्रिक बस कंत्राटदाराचे महामंडळाकडून चांगलेच लाड पुरविले जात आहेत. महामंडळ कंत्राटदाराच्या ओंजळीने पाणी पीत असल्याने परिवहन मंत्र्यांनी केलेली कंत्राट रद्दची घोषणा फुसका बार ठरली आहे. कंत्राट रद्द करण्याची घोषणा किमान तीन वेळा करण्यात आली.

महामंडळाने ५१५० इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा करार नोव्हेंबर २०२३ मध्ये केला होता. कंपनीने आतापर्यंत चार हजार बसेस पुरविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मार्च २४ ते मार्च २५ या कालावधीत नऊ मीटर लांबीच्या १३८ आणि १२ मीटर लांबीच्या ८२ अशा २२० बसेस पुरविण्यात आल्या. 

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आणि एसटीचे तत्कालीन अध्यक्ष संजय सेठी यांनी कंपनीला मे २०२५ पर्यंत १२८७ बस पुरविण्यात याव्यात, असे इशारा पत्र दिले होते. याची मुदत संपूनही प्रगती झाली नाही. एसटीचे विद्यमान अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कंपनीच्या कंत्राट रद्दची घोषणा तीन दिवसांपूर्वी केली होती. यातून काहीही निष्पन्न झाले नाही. पुन्हा एकदा वेळापत्रक ठरवून देण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की व्यवस्थापनावर ओढवली.

तोट्याचा सौदा१२ मीटर लांबीच्या बसमध्ये सलग नऊ वर्षे प्रती किलोमीटर १२ रुपये तर, नऊ मीटर लांबीच्या बसमध्ये सलग पाच वर्षे प्रती किलोमीटर १६ रुपये तोटा सहन करावा लागणार आहे. यातून भविष्यात ३,१९१ कोटी रुपये इतका तोटा होणार आहे. हा तोट्याचा सौदा असल्याचे बोलले जात आहे.

"विजेवरील बस वेळेत न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या वल्गना वारंवार करणाऱ्या व्यवस्थापनाने कंपनीला पुन्हा एकदा वेळापत्रक ठरवून देणे हे विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. एसटीच्या व्यवस्थापनाने कंपनीसमोर पुन्हा एकदा सपशेल गुडघे टेकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराराच्या या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करावी."- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :Yavatmalयवतमाळ