शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

३० अवैध दारूविक्रेते निशाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:27 IST

वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्दे‘एमपीडीए’चा प्रस्ताव : जिल्ह्यातील शंभर सक्रिय गुंडांना तडीपार करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे जिल्हाभरातील ठाणेदारांची क्राईम मिटिंग घेतली. गुन्हेगारी, अवैध धंदे, संघटित टोळ्या, तस्करी, प्रलंबित गुन्हे, डिटेक्शनचे घटलेले प्रमाण अशा विविध मुद्यांवर ठाणेदारांकडून आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये सक्रिय गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर, अवैध दारू विक्रेते हे विषय प्रकर्षाने गाजले. पोलीस व एक्साईजकडून गावागावांतील दारू विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केली जाते. या विक्रेत्यांविरुद्ध महिला व ग्रामीण जनता रस्त्यावर उतरते. त्यांचे मोर्चे एसपी कार्यालय, जिल्हा कचेरीवर धडकतात. मात्र त्यानंतरही अवैध दारूची निर्मिती व विक्री सुरूच राहते. अशा दारू विक्रेत्यांना वठणीवर आणण्यासाठी यापुढे एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्टीव्हीटीज) अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत एमपीडीएसाठी जिल्ह्यातील ३० प्रमुख अवैध दारू विक्रेते निशाण्यावर आहेत. त्यांच्या प्रस्तावांवर अखेरचा हात फिरविला जात असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात समाजासाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या सुमारे १०० सक्रिय गुंडांना तडीपार केले जाणार आहे. त्यांचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत अन्य विविध मुद्यांवरही आढावा घेण्यात आला.दारू माफियांवर कारवाई केव्हा ?पोलीस अवैध दारू विक्रेत्यांवर एमपीडीए लावणार असली तरी यवतमाळातील दारूचे माफिया म्हणून ओळखले जाणारे म्होरक्यांवर एमपीडीए लावण्याची हिंमत पोलीस प्रशासन दाखविते का हे पाहणे महत्वाचे ठरते. बंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात राजरोसपणे दारू पोहोचविणारे हे माफिया सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाला आहेत. त्यामुळेच पोलीस प्रशासन त्यांच्याबाबत सातत्याने बोटचेपी भूमिका घेताना दिसते. या उलट दारू विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करून मोठ्या ‘कामगिरी’चा देखावा निर्माण केला जातो.महिला व बालकांची सुरक्षा सांभाळा-एसपीमहिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भात सातत्याने जागरुक राहण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ठाणेदारांना दिले. यासंबंधी कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शनही करण्यात आले.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस