शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

दिग्रस येथून ४७ यात्रेकरू हज यात्रेला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 22:09 IST

येथून ४७ यात्रेकरून पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना एका कार्यक्रमात सर्वधर्मीय समाजबांधवांनी निरोप दिला. यावर्षी शासनाच्या हज कमिटी व खासगी टुर्सद्वारे अनेक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातून ३८० हजयात्री : सर्वधर्मीय समाजबांधवांकडून निरोप, यात्रेपूर्वी यवतमाळ, पुसद, दिग्रसमध्ये लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथून ४७ यात्रेकरून पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना एका कार्यक्रमात सर्वधर्मीय समाजबांधवांनी निरोप दिला.यावर्षी शासनाच्या हज कमिटी व खासगी टुर्सद्वारे अनेक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जात आहे. त्यात येथील ४७ महिला-पुरुष यात्रेकरूंना सर्वधर्मीय बांधवांकडून निरोप देण्यात आला. जिल्ह्यातून यावर्षी तब्बल ३८० मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी रवाना झाले. जगभरातील शेकडो मुस्लीम बांधव सऊदीअरब येथे पवित्र हज यात्रेला जातात. इस्लामी देश असलेल्या इंडोनेशियानंतर तेथे सर्वाधिक हज-यात्रेकरू आपल्याच देशातील असतात. यंदा तब्बल दोन लाख भारतीय यात्रेसाठी पात्र ठरले. त्यात जिल्ह्यातील ३८० मुस्लीम बांधवांचा समावेश आहे. यात तालुक्यातून ४७ महिला व पुरुष पवित्र हजसाठी रवाना झाले. यात दिग्रस ब्लॉक जिनिंग प्रेसिंग संस्थेचे माजी अध्यक्ष अब्दुल हक सेठ, मौलाना काजी ग्यासोद्दीन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुहम्मद एजाज, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ए.एस. शेख, शब्बीर खान, डॉ.अशफाक, आरिफ गारवे, मुहम्मद मुख्तार, नासीर खान, मुहम्मद अय्युब, सैयद हबीब, मुहम्मद जावेद, मजीद डोसानी, युनूस बाळापुरे, अब्दुल करीम यांच्यासह कलगाव येथील १४ बांधव आणि महिलांचा समावेश आहे.या सर्वांना माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, शहराध्यक्ष रवींद्र अरगडे, राजा चौहान यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लीम बांधवांनी निरोप दिला. त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला.देशाच्या चौफेर प्रगतीसाठी प्रार्थना करणारयात्रेपूर्वी यवतमाळ, दिग्रस व पुसद या तीन ठिकाणी त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे जिल्हा प्रशिक्षक हाजी एजाजुद्दीन यांनी सर्व हज यात्रेकरूंना पाणीटंचाई व कास्तकारांवरील संकटांचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी व देशाची चौफेर प्रगती, यश व अखंडतेसाठी तेथे विशेष प्रार्थना करण्याची विनंती केली.

टॅग्स :Haj yatraहज यात्रा