लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात दुसऱ्या राज्यातील १९५ तर, राज्यातील ८६ याप्रमाणे २८१ नागरिक ठिकठिकाणी अडकले आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने आणि निर्देशानुसार ठिकठिकाणी त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तेलंगाणातील वेदप्रसाद साहू यांच्यासोबत १५, चुरू राजस्थानमधील दिवाकर घोजक यांच्यासोबतच्या १४ जणांची व्यवस्था राळेगावला सुराणा व महावीर जिनिंगमध्ये करण्यात आली आहे. गोरखपूर उत्तरप्रदेश येथील लक्ष्मणदास गंगावन यांच्यासोबत १७ जण वडगाव येथे, मध्यप्रदेशमधील देशमुख यांच्यासोबत असलेले १५ जण वाढोणाबाजार, मध्यप्रदेशमधील श्याम वरखेडे यांच्यासोबतच्या ३८ जणांची वडकी येथे, छत्तीसगढमधील सुनील जोशी यांच्यासोबतच्या ४६ लोकांची वडकीला, तर मध्यप्रदेशमधील सुनील यादव यांच्यासोबतच्या २३ जणांची गुजरी येथे राहण्याजेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील कोळंबा (ता.मंगरूळपीर, जि.वाशिम) येथील विनोद राठौडसोबत १९ जण शेळी येथे, जळगाव येथील मुकेश जाधव यांच्या सोबतचे २० जण वाढोणाबाजार, पहुनगाव येथील सुकेश गायधने यांच्यासोबतचे ११ जण खैरी येथे अडकले आहेत. याशिवाय कमी संख्येतील नागरिक ठिकठिकाणी तालुक्यातील विविध ठिकाणी अडकले आहे. वडकी, खैरी, वाढोणा परिसरातील अनेकांना राळेगाव येथे विविध ठिकाणी आणण्यात आले आहे.रुग्णालयांची दुरवस्थाविविध सामाजिक, राजकीय संघटना, भाजपा आदी या लोकांना राहण्याजेवण्याची व्यवस्था पुरवित आहे. प्रशासनाने वेळोवेळी यावर नजर ठेऊन आवश्यक संपर्क, समन्वय ठेवला आहे. हिंगणघाट, नागपूर, नाकापार्डी, सावली, वाशिम आदी ठिकाणचे लोकही येथे अडकले आहेत.
राळेगावात अडकले बाहेरचे २८१ नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST
महाराष्ट्रातील कोळंबा (ता.मंगरूळपीर, जि.वाशिम) येथील विनोद राठौडसोबत १९ जण शेळी येथे, जळगाव येथील मुकेश जाधव यांच्या सोबतचे २० जण वाढोणाबाजार, पहुनगाव येथील सुकेश गायधने यांच्यासोबतचे ११ जण खैरी येथे अडकले आहेत. याशिवाय कमी संख्येतील नागरिक ठिकठिकाणी तालुक्यातील विविध ठिकाणी अडकले आहे.
राळेगावात अडकले बाहेरचे २८१ नागरिक
ठळक मुद्देपरप्रांतातील लोक : ठिकठिकाणी करण्यात आली राहण्याची व जेवणाची सोय