एसबीआयचे २८ लाख घेऊन कर्मचारी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:09+5:30

इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीत तो कार्यरत होता. या कंपनीकडे स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट आहे. या कंत्राटी कंपनीअंतर्गत संतोष रामचंद्र वाटेकर, उज्ज्वल अरूण बर्वे व गुरूदेव महादेव चिडे हे कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी स्टेट बँकेअंतर्गत येणाऱ्या वणी परिसरातील सहा एटीएममध्ये पैसे भरतात.

28 lakh SBI employees absconding | एसबीआयचे २८ लाख घेऊन कर्मचारी फरार

एसबीआयचे २८ लाख घेऊन कर्मचारी फरार

Next
ठळक मुद्देएटीएमची रक्कम। वणीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी (यवतमाळ) : स्टेट बँकेच्या एटीएममध्ये टाकण्यासाठी दिलेली २८ लाख रूपयांची रक्कम घेऊन एका खासगी कंपनीचा कर्मचारी फरार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. संतोष रामचंद्र वाटेकर (३५) असे आरोपीचे नाव असून तो वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी आहे.
इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीत तो कार्यरत होता. या कंपनीकडे स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट आहे. या कंत्राटी कंपनीअंतर्गत संतोष रामचंद्र वाटेकर, उज्ज्वल अरूण बर्वे व गुरूदेव महादेव चिडे हे कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी स्टेट बँकेअंतर्गत येणाऱ्या वणी परिसरातील सहा एटीएममध्ये पैसे भरतात. एटीएममध्ये भरलेल्या पैशाची खात्री करण्याची जबाबदारी वणीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील कॅश ऑफिसर व अकाउंंटंट यांच्यावर आहे. २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास स्टेट बँकेचे कॅश ऑफिसर मनिष गणवीर यांनी इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि.या कंपनीचे कर्मचारी संतोष वाटेकर, गुरूदेव चिडे व उज्ज्वल बर्वे या तिघांना ८३ लाख रूपयांची रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी दिली. यापैकी गुरूदेव चिडे व उज्ज्वल बर्वे या दोघांनी वणी परिसरातील वेगवेगळ्या चार एटीएममध्ये ५५ लाख रूपये भरले. नायगाव व मारेगाव येथील एटीएममध्ये २८ लाख रूपये भरण्यासाठी संतोष वाटेकर हा सदर रक्कम घेऊन सायंकाळी ६ वाजता रवाना झाला. तेव्हापासून तो अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा मोबाईलदेखील बंद आहे. याप्रकरणी स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक रवींद्र तुकाराम बरगी यांनी वणी पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष वाटेकर याच्याविरूद्ध भादंवि ४०८ अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

एटीएमची सुरक्षा वादाचा विषय
एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम कर्मचाऱ्याने परस्पर उडविल्याचा हा प्रकार जिल्हाभरात चर्चेत आहे. मात्र वणीसह जिल्हाभरातीलच एटीएम सेंटरची सुरक्षा सतत वादाचा विषय ठरत आहे. या केंद्रांवर सुरक्षा रक्षक तैनात असले तरी खासगी एजंसीमार्फत नेमलेले हे रक्षक अनेकदा गैरहजर आढळतात. आता तर चक्क ज्यांच्या ताब्यात रोख दिली जाते, तेच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. एटीएमची सुरक्षा वाढविण्याची गरज आहे.

Web Title: 28 lakh SBI employees absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.