शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पुसदमध्ये २५२ जणांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

तालुक्यात ग्रामीण भागातील साडे तीन लाख नागरिकांसाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहरी भागातील दीड लाख लोकसंख्येसाठी उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतनगर व गढी वॉर्ड येथे दोन नागरी आरोग्य केंद्रे आहे. या सर्व ठिकाणी कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक स्थापन करण्यात आले. त्यात १८ एप्रिलपर्यंत २५२ तापाचे रुग्ण आढळले.

ठळक मुद्देएकही पॉझिटिव्ह नाही : तालुक्यात नऊ कोरोना फिवर क्लिनिक स्थापन

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शासन व प्रशासन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून उपाययोजना करीत आहे. यात तालुक्यात १० एप्रिलपासून नऊ ‘कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक’ उभारण्यात आले. या क्लिनिकमध्ये २५२ तापाचे रुग्ण आढळून आले. मात्र त्यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही.तालुक्यात ग्रामीण भागातील साडे तीन लाख नागरिकांसाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहरी भागातील दीड लाख लोकसंख्येसाठी उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतनगर व गढी वॉर्ड येथे दोन नागरी आरोग्य केंद्रे आहे. या सर्व ठिकाणी कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक स्थापन करण्यात आले. त्यात १८ एप्रिलपर्यंत २५२ तापाचे रुग्ण आढळले. उपजिल्हा रुग्णालयात ८०० पैकी ३५ रुग्ण, जांबबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात ५१४ पैकी ३८, चोंढी केंद्रात ६२१ पैकी ५५ रुग्ण, फेट्रा केंद्रात ४७७ पैकी ४४ रुग्ण, बेलोरा केंद्रात २८६ पैकी २८ रुग्ण, शेंबाळपिंप्री केंद्रात २८४ पैकी १४ रुग्ण, गौळ बु. केंद्रात २८८ पैकी ३६ रुग्ण, नागरी आरोग्य केंद्र क्रमांक १ मध्ये ९२ पैकी एक आणि नागरी आरोग्य केंद्र क्रमांक २ मध्ये १३२ पैकी एक असे एकूण २५२ रुग्ण तापाचे आढळले. त्यांना औषधी देण्यात आली. त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुका कोरोना नियंत्रण समितीतर्फे येथे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले. आयुर्वेद महाविद्यालयात ६० बेड, आसरपेंडच्या मुलींच्या निवासी शाळेत १०० बेड, तलाव ले-आऊटमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहात २५ बेड आणि वरुडच्या आयटीआयमध्ये १५ बेडचे अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. वैशाख वाहूरवाघ, सचिव डॉ. आशिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. शरद ताटेवार, डॉ. अमोल पाटील आदींच्या नेतृत्वात वैद्यकीय पथके तयार करण्यात आली. ही पथके नऊही कोरोना फिवर क्लिनिकवर लक्ष ठेवून आहे. संशयित आढळल्यास त्वरित उपाययोजना केली जाणार आहे.इसापूरच्या ‘त्या’ चार जणांना यवतमाळातून सुटीतालुक्यातील इसापूर (धरण) येथील चार जणांना खोकल्याच्या त्रासामुळे शनिवारी रुग्णवाहिकेव्दारे यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ नेले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याने चारही जणांना रविवारी सुटी देण्यात आली.त्यांना तीन दिवस वैद्यकीय निगराणीत ठेवणारनऊ फिवर क्लिनीक उभारण्यात आले असून आत्तापर्यंत २५२ रुग्ण तापाचे आढळले. त्यांना तीन दिवस वैद्यकीय निगराणीत ठेवले जाणार आहे. मात्र तालुक्यात सध्या एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी केले.होम क्वारंटाईन पूर्णब्रिटन, नेपाळ, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रिका, दुबई आदी देशातून परत आलेल्या २६ नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. तथापि, लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य