शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

सिलिंडरसाठी २५ किलोमीटरचा प्रवास

By admin | Updated: January 10, 2015 23:04 IST

गॅस एजन्सी नसल्याने परिसरातील ३० गावांमधील नागरिकांना सिलिंडरसाठी २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातही एकाच फेरीत सिलिंडर उपलब्ध होईल याची शक्यता नसल्याने रिकाम्या

अब्दुल मतीन - पारवागॅस एजन्सी नसल्याने परिसरातील ३० गावांमधील नागरिकांना सिलिंडरसाठी २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातही एकाच फेरीत सिलिंडर उपलब्ध होईल याची शक्यता नसल्याने रिकाम्या हातानेही परतावे लागते. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी पारवा येथे गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या भागातील विशेषत: पारवा गावातील बहुतांश नागरिकांकडे गॅस सिलिंडर आहे. त्यांना पांढरकवडा किंवा घाटंजी येथील एजन्सीशी जोडण्यात आले आहे. दोन ते तीन हजार नागरिकांपुढे रिकामे झालेले सिलिंडर भरून आणण्याचा प्रश्न आहे. पांढरकवडा येथे जोडलेल्या नागरिकांना २५ किलोमीटर तर घाटंजी येथे २२ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. एसटी बसमध्ये या ज्वालाग्राही वस्तूची वाहतूक करण्यास मनाई आहे. त्यामुळे खासगी वाहनांद्वारे किंवा दुचाकीने सिलिंडर संबंधित ठिकाणी घेवून जावे लागते. ही सर्व सर्कस केल्यानंतरही एजन्सीमध्ये तत्काळ भरलेले सिलिंडर उपलब्ध होईलच याची शक्यता नसते. अशावेळी रिकामे सिलिंडर घेवून परतावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात तर मोठी सर्कस करावी लागते. दुचाकीने वाहतूक अशक्य होते तर खासगी वाहनांची संख्या कमी होते. तासंतास प्रतीक्षेनंतरही वाहन उपलब्ध होत नाही. अशावेळी रॉकेल किंवा जलतनाच्या आधारे स्वयंपाक करावा लागतो. पारवा येथे गॅस एजन्सीसाठी नागरिकांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनीही ही बाब लावून धरली. परंतु प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. प्रवासासोबतच भाड्याचाही खर्च वाढतो. एका फेरीसाठी किमान १०० ते १२५ रुपये खर्च येत असल्याने सिलिंडरची किंमत ८०० ते ९०० रुपयांवर जाते. गावामध्ये काही ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या सिलिंडरसाठी हजार ते अकराशे रुपये मोजावे लागतात. ग्रामीण भागात जलतनासाठी सागवानासह इतर प्रकारच्या लाकडांचा वापर केला जातो. धुरामुळे त्यांना डोळ्यांचे आजार जडतात. यावर उपाय म्हणून अनुदानावर सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र पहिले सिलिंडर संपल्यानंतर दुसऱ्यासाठी त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. परिणामी सिलिंडर घराची शोभा वाढवित आहे.