शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

2100 चालक-वाहकांचा रोज सव्वा लाख प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊननंतरच्या काळात दरदिवसाला दीड लाख प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस नव्याने संचारबंदी लागू झाल्यावर एक लाख दहा हजार प्रवासी ने-आण करण्याचे काम नित्याने करीत आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक आणि चालक कोरोना काळात सर्वाधिक अफेक्टेड होऊ शकतात. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देदररोज जनसंपर्क येऊनही कोरोना लस देण्याचा विचार झालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे ब्रीद वाक्य घेऊन चालणारी एसटी कोरोनानंतरच्या काळातही प्रवाशांना अविरत सेवा देत आली आहे. या सेवेकरिता झटणारे कर्मचारी मात्र, अजूनही महामारीत असुरक्षित आहेत. त्यांना लस उपलब्ध करून सुरक्षित करावे, अशी मागणी वाहक आणि चालकांकडून जाेर धरत आहे.जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊननंतरच्या काळात दरदिवसाला दीड लाख प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस नव्याने संचारबंदी लागू झाल्यावर एक लाख दहा हजार प्रवासी ने-आण करण्याचे काम नित्याने करीत आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक आणि चालक कोरोना काळात सर्वाधिक अफेक्टेड होऊ शकतात. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. असे केले तरच वाहक आणि चालक सुरक्षित होतील. त्यांच्याकडून इतरांना धोकाही होणार नाही किंवा इतरांकडून त्यांनाही कोरोनाची लागण होणार नाही. यामुळे गावखेड्यातून शहरात प्रवासी घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुरक्षित होईल. यासाठी आरोग्य विभागाने एसटी कर्मचाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेत प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून रेटली जात आहे. अद्यापही लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कुठलाही होकार आला नाही. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संख्या मात्र मागविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. एसटीने प्रवास करताना अनेक प्रवासी खासगी वाहनांचा विचार करताना पाहायला मिळतात. याचे मूळ कारण कोरोनाबाबत उपाययोजना नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. याकरिता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

११०००० प्रवाशांचा रोज प्रवास

गावापासून शहरापर्यंत प्रवाशांना ने-आण करण्याचे काम एसटी करते. दर दिवसाला राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून एक लाख दहा हजार प्रवासी प्रवास करतात. वाहक आणि चालक या प्रवाशांच्या दररोज संपर्कात असतात. यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. त्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरणाची गरज आहे.

तपासणीच नाही

कोरोना याेद्धा म्हणून डाॅक्टर, पोलीस, महसूल कर्मचारी, आशा यांना प्रथम तपासणी करून लसीकरण करण्यात आले. मात्र, सर्वाधिक जनसंपर्क असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना तपासल्याच गेले नाही. त्यांना लसीकरणासाठी लसही अद्यापपर्यंत उपलब्ध झाली नाही.

विभागीय कार्यालयाकडून जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यांना औषधोपचार करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये लसीकरणासाठी विभागाकडे मागणी नोंदविण्यात येणार आहे. यामुळे लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक

एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी सीएसकडे कोरोना लसीची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही आज जिल्हा प्रशासनाकडे, आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भात उपाययोजना होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचारी सुरक्षित होतील.- संदीप मडावी, कामगार अधिकारी

कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी संघटनेने विभागीय कार्यालयाकडे लसीकरणाची मागणी केली आहे. कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणारे घटक आहेत. वेगवेगळ्या प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. यामुळे त्यांना सुरक्षित करण्यासाठी कोरोनाची लस महत्त्वाची आहे.- गणेश गावंडे, अध्यक्ष, कामगार सेना