शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची समोरासमोर धडक; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 17:34 IST

भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने राहुलच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात राहुल गंभीर जखमी झाला.

उमरखेड (यवतमाळ) : येथील दत्त मंदिराजवळील हरदडा फाट्याजवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील २१ वर्षीय तरुण राहुल विश्वंभरराव बोंबीलवार याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत राहुलचा भाऊ विकी बोंबीलवार याने दिलेल्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील राहुल बोंबीलवार सध्या नांदेडमधील दातीवाला पेट्रोल पंपासमोर राहतो. तो आपल्या मोटारसायकलने उमरखेड येथून विडूळमार्गे ढाणकीकडे जात होता. त्यावेळी एका  दुचाकीने (एमएच २९ वाय ५५१६) भरधाव वेगात राहुलच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उमरखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव दुचाकीने ठोकरले; एकजण गंभीर

आर्णी तालुक्यातील परसोडा येथील नारायण देशमुख हे त्यांच्या दुचाकीवरून आर्णीवरून गावाकडे परतत असताना एमएच-२९-बीजी-७०२० या दुचाकीचालकाने भरधाव वेगाने नारायण देशमुख यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नारायण देशमुख हे जबर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विक्रम देशमुख यांच्या फिर्यादीवरून आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात देशमुख यांच्या वाहनाचे २५ हजारांचे नुकसान झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Accidentअपघातyavatmal-acयवतमाळ