शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

48 तासात 202 नवीन पॉझिटीव्ह ;आठ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:09 IST

पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 205 जणांना सुट्टी  

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 205 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 48 तासात जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यात दोन दिवसांत 202 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यात 1 सप्टेंबर रोजी 107 जण पॉझेटिव्ह तर 2 सप्टेंबर रोजी 95  जण पॉझेटिव्ह आले आहेत.48 तासात मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 85 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला आणि 46 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 32 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 47 वर्षीय महिला, नेर शहरातील 70 वर्षीय व 64 वर्षीय पुरुष आणि घाटंजी तालुक्यातील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

1 सप्टेंबर रोजी पॉझेटिव्ह आलेल्या 107 जणांमध्ये 72 पुरुष व 35 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 32 पुरुष व 17 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील एक पुरुष, वणी तालुक्यातील दोन पुरुष, महागाव शहरातील 13 पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, पुसद शहरातील चार पुरुष व तीन महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सात महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, आर्णी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, दारहव्हा शहरातील एक पुरुष, अमरावती येथील एक पुरुष, अकोला येथील एक महिलेचा समावेश आहे.

आज (दि. 2) पॉझेटिव्ह आलेल्या 95 जणांमध्ये 63 पुरुष व 32 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील 18 पुरुष व आठ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, बाभूळगाव शहरातील सात पुरुष व एक महिला, नेर शहरातील एक पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील दोन पुरुष, उमरखेड तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील 10 पुरुष व सात महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील पाच पुरुष व चार महिला, वणी शहरातील तीन पुरुष व सहा महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 626 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 216 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3601 झाली आहे. यापैकी 2667 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 92 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 197 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 237 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 51103 नमुने पाठविले असून यापैकी 47842 प्राप्त तर 3261 अप्राप्त आहेत. तसेच 44241 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस