शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यवतमाळ वनवृत्तामध्ये कापली 20 हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

यवतमाळ वनवृत्ताचे हे अपयश माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळविलेली माहिती त्यांनी ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली आहे. सन २०१८ मध्ये यवतमाळ वनवृत्तात सागवानाची ६१५७ झाडे कापल्याने ४२ लाख पाच हजार रुपयांचा दणका वनविभागाला बसला. हाच प्रकार दुसऱ्या वर्षीही कायम राहिला. २०१९ मध्ये सागवानाच्या ४५३२ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली.

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनविभागाने जिल्ह्यातील जंगल जणू तस्करांच्या हवाली करून दिले आहे. दरवर्षी अवैध वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत असताना या विभागाची यंत्रणा सुस्त आहे. गेली साडेतीन वर्षांत यवतमाळ वनवृत्तात सागवानाची १९ हजार ४६३ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. यातून एक कोटी ३४ लाख रुपयांहून अधिक रकमेचा दणका या विभागाला बसला. बेवारस असलेले वननाके, वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुख्यालयाला दांडी, जंगलात होत असलेले वाढते अतिक्रमण याचा हा परिणाम मानला जात आहे. सागवानाशिवाय इतर प्रकारची वृक्षही बेसुमार कापली जात आहेत. यावर नियंत्रण आणण्यात वनविभागाची मंडळी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवासस्थाने उभारली आहेत. याचा वापर हे कर्मचारी अपवादानेच करतात. या बंगल्यांना मोठमोठ्या झुडुपांनी वेढले आहे. दारे, खिडक्या भुरटे चोर काढून नेत आहेत. कर्मचाऱ्यांचे वनाकडे होत असलेले दुर्लक्षच सागवान चोरट्यांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देत आहे. यवतमाळ वनवृत्ताचे हे अपयश माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळविलेली माहिती त्यांनी ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली आहे. सन २०१८ मध्ये यवतमाळ वनवृत्तात सागवानाची ६१५७ झाडे कापल्याने ४२ लाख पाच हजार रुपयांचा दणका वनविभागाला बसला. हाच प्रकार दुसऱ्या वर्षीही कायम राहिला. २०१९ मध्ये सागवानाच्या ४५३२ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. ३२ लाख २७ हजार रुपयांची संपत्ती तस्करांच्या घशात गेली.सन २०२० मध्ये वृक्षतोडीची गती खूपच वाढली. या वर्षात परवाना मिळाल्यागत झाडे तोडण्यात आली. ६१५७ सागवान वृक्ष या वर्षात कापून ४२ लाख पाच हजार रुपयांचा दणका या खात्याला दिला. सागवानाशिवाय इतर प्रकारची लाखो रुपयांची वृक्षही कापण्यात आली. वनविभागाची यंत्रणा तस्करांचा हा प्रताप पाहण्यापलीकडे काहीच करू शकली नाही. 

चालू वर्षात तोडली अडीच हजार वृक्ष - सन २०२१ मधील सहा महिने वनतस्करांसाठी वनविभागाच्या कृपेने चांगलेच लाभदायी ठरले. २२२९ सागवान झाडे कापण्याची संधी तस्करांनी साधली. १४ लाख ४९ हजार रुपयांचा चुना या काळात वनविभागाला लावण्यात आला. अजूनही जंगल सपाट करण्याची तस्करांची मोहीम थांबलेली नाही. वनविभागाला याचे काहीही सोयरसुतक नाही. बेसुमार होत असलेली वृक्षतोड थांबविण्यासाठी वृक्षप्रेमी पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पुसद वनविभाग टॉपवर- यवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभाग वृक्षतोडीमध्ये टॉपवर आहे. या विभागात अवघ्या सहा महिन्यांत सागाची ९६६ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. त्या खालोखाल यवतमाळ (५१६), तर पांढरकवडा वनविभाग तिसऱ्या (३८०) स्थानावर आहे. लाखो रुपयांची वृक्षतोड या विभागात झालेली आहे. वृक्षतोडीचे प्रमाण असेच राहिल्यास मोठमोठी जंगलं नष्ट झाल्यास नवल वाटू नये. 

 

टॅग्स :forest departmentवनविभाग