शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

20 वर्षीय तरुणीने पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच गळफास लावून घेतल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

पोलीस खात्यात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून शुक्रवारी गंगाला आपल्या किरायाच्या घरी आणले. बराच वेळ उलटूनही गंगा घराबाहेर आली नाही तसेच घराचे दार आतून व बाहेरून बंद असल्याने घर मालकाचा मुलगा आकाश कृष्णा बारसकर याने पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच बारसकर यांचे घर गाठले. दरवाजा तोडून आत पाहिले असता गंगा ही गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. 

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात २० वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी वसंतनगर परिसरात उघडकीस आली. दरम्यान, मुलीवर अत्याचार करून संबंधित पोलिसानेच तिला गळफास लावून मारल्याची तक्रार मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून आरोप असलेल्या पोलिसाला ठाणेदारांनी ताब्यात घेतले आहे. गंगा संजय कोरडे (२०) रा. वेणी ता. पुसद असे मृत तरुणीचे नाव आहे. तर दंगल नियंत्रक पथकातील पाेलीस कर्मचारी विजय हटकर (४२) असे आरोप असलेल्या पोलिसाचे नाव आहे. हटकर हा कर्मचारी येथील वसंतनगर परिसरात किरायाच्या घरी राहतो. त्याने पोलीस खात्यात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून शुक्रवारी गंगाला आपल्या किरायाच्या घरी आणले. बराच वेळ उलटूनही गंगा घराबाहेर आली नाही तसेच घराचे दार आतून व बाहेरून बंद असल्याने घर मालकाचा मुलगा आकाश कृष्णा बारसकर याने पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच बारसकर यांचे घर गाठले. दरवाजा तोडून आत पाहिले असता गंगा ही गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. मुलीचे वडील संजय कोरडे यांनीही लगेच घटनास्थळ गाठले. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिच्यावर अत्याचार करून खून केला, अशी तक्रार त्यांनी उमरखेड पोलिसात दाखल केली. पोलिसांनी या घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद केली. मुलीच्या वडिलांनी गंभीर तक्रार केल्यामुळे पोलिसांनी गंगाचा मृतदेह यवतमाळ येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. 

  पोलीस खात्यात नोकरीचे आमिष

- २० वर्षाच्या गंगाला पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उमरखेडमध्ये आणले गेले. नोकरीच्या बहाण्याने गैरफायदा घेतला गेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. गंगाने आत्महत्या केली की तिचा खून  झाला, ही बाब शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होणार आहे. 

तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दंगल नियंत्रण पथकातील रजेवर असलेला कर्मचारी विजय हटकर याला तपासासाठी ताब्यात घेतले आहे. - अमोल माळवे, ठाणेदार, उमरखेड 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी