शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

११९ ग्रामपंचायती आॅफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 9:38 PM

विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील संगणक परिचालक संपावर गेले. यामुळे तालुक्यातील ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेने संप पुकारला आहे.

ठळक मुद्देपुसद तालुका : संगणक परिचालक गेले संपावर, कामकाज पडले ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील संगणक परिचालक संपावर गेले. यामुळे तालुक्यातील ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत.पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेने संप पुकारला आहे. संघटनेने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल इंडियाचे काम पाहात आहे. हे संगणक परिचालक २0११ पासून संग्राम प्रकल्पात व नंतर २0१६ पासून आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून १९ प्रकारचे आॅनलाइन दाखले प्रदान करतात. यात ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने संगणीकृत करणे, केंद्र व राज्य सरकारच्या ११ सॉफ्टवेअरमध्ये नोंदी घेणे, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी आदी कामे ते करीत आहेत.शासनाने या कामासाठी आता एका खासगी कंपनीची नियुक्ती केली. त्या कंपनीला शासन चौदाव्या वित्त आयोगातून प्रतिवर्षी प्रति केंद्र चालक एक लाख ४७ हजार रुपये अग्रीम अदा करते. त्यापैकी कंपनी व्यवस्थापन खर्च म्हणून ४५0 रुपये, स्टेशनरीसाठी दोन हजार ७00, प्रशिक्षणासाठी एक हजार ३00 रुपये आपल्याकडे ठेवून संगणक परिचालकास दरमहा केवळ पाच ते सहा हजार रुपये मानधन देते. विशेष म्हणजे हे मानधनही नियमित न देता चार ते पाच महिन्यांच्या अंतराने दिले जाते.सध्या एप्रिलपासूनचे मानधन कंपनीकडे थकीत आहे. तथापि मानधनासाठी चौदाव्या वित्त आयोगातून राखीव असलेली रक्कम कंपनीकडे जमा झाली आहे. मात्र अद्याप मानधन अदा करण्यात आले नाही. त्यामुळे संगणक परिचालक संपावर गेले आहे.आयटी विभागात नियुक्ती द्यावीसंगणक परिचालकांना शासनाच्या आयटी विभागात नियुक्ती द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासन दिले होते. मात्र आठ महिने लोटूनही अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती देऊन न्याय द्यावा. अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत ग्रामपंचायतींचे सर्व कामकाज बंद राहील, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण बरडे, सचिव शरद पवार, उपाध्यक्ष अश्विन देशमुख व तालुक्यातील संगणक परिचालकांनी दिला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत