शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच महिन्यात रस्ता अपघाताचे १७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:31 IST

जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, ...

ठळक मुद्दे५० जणांना अपंगत्व : वेगाशी स्पर्धा आणि वाहतुकीचे नियम पायदळी

ज्ञानेश्वर मुंदे ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, तर दुचाकीच्या अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. टिप्परखाली चिरडून नायगाव येथे झालेला चिमुकलीचा मृत्यू मन हेलावून सोडणारा होता.वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले की, अपघात निश्चितच होतो. जिल्हाभरात मार्च महिन्यात झालेल्या अपघातातही हीच कारणे आहेत. मार्च महिन्याची सुरुवात जवळा येथे एका ट्रकने तीन दुचाकींना धडक देऊन झाली. ५ मार्च रोजी झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. यवतमाळ शहरात ६ मार्चच्या रात्री दोन भरधाव कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कुणी दगावले नाही. मात्र अपघाताची तीव्रता भीषण होती. पांढरकवडा तालुक्यातील इचोड गावाजवळ ९ मार्च रोजी एक वृद्ध अपघातात ठार झाला. तर उमरखेड तालुक्यात मार्लेगावजवळ दोन ट्रकच्या धडकेत छातीत लोखंडी रॉड शिरल्याने चालक दगावला. १४ मार्च रोजी वणी तालुक्यातील खांदलाजवळ दुचाकीस्वार दोघे जण अपघाताचे बळी ठरले. वणी तालुक्यातील करणवाडी येथे १५ मार्चला ट्रॅक्टर चालक ठार झाला तर जालना जिल्ह्यातील दुसरबीडजवळ झालेल्या अपघातात यवतमाळचे पं. शशीकांत शर्मा ठार झाले.यवतमाळच्या बसस्थानक चौकातील सिग्नलवर १७ मार्च रोजी झालेल्या अपघाताने संपूर्ण यवतमाळ हादरुन गेले होते. दुचाकीवरील सासरे आणि सुनेला ट्रकने अक्षरश: चिरडले. या अपघातात दोन वर्षाची चिमुकली माही बचावली. या अपघातानंतर यवतमाळ शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांनी या अपघातातून धडा घेत ‘यु-टर्न’चा प्रयोग सुरू केला. नेर तालुक्यातील बाळेगावजवळ अ‍ॅपे आॅटोरिक्षा उलटून सात जण गंभीर जखमी झाले. २३ मार्च रोजी यवतमाळातील मेळावा आटोपून उमरखेडकडे जाताना माजी आमदार विजय खडसे जखमी झाले. त्यांच्या वाहनावर ट्रीपल सीट दुचाकी आदळली. ते तिघे तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. २४ मार्चला शिरपूरजवळ चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण दुचाकी अपघातात गतप्राण झाला.२८ मार्चच्या पहाटे परभणी येथून चंद्रपूरच्या महाकाली दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला ट्रकने धडक दिली. त्यात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. या अपघाताची शाई वाळत नाही तोच २९ मार्च रोजी कोसारा गावाजवळ भीषण अपघात झाला. टिप्परने दिलेल्या धडकेत मिनीडोअरमधील दोन जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, एका तरुणाचे डोके धडापासून वेगळे झाले होते तर दुसºया तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. याच दिवशी आॅटोरिक्षातून उतरुन रस्ता पार करताना एक चिमुरडी टिप्पर खाली आली. नऊ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने समाजमन हेलावून गेले.जिल्ह्यातील या अपघाताच्या मालिकेने कुणाचे वडील, कुणाची आई तर कुणाचे भाऊ-बहीण दगावले. वाहन चालविताना झालेली थोडी चूक जीवावर बेतली. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर निश्चितच अपघात टाळता येतात.दोन प्राध्यापकांना गमवावा लागला जीवमार्च महिन्यात दुचाकी अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. १४ मार्च रोजी पुसद तालुक्यातील बेलगव्हाण येथे दुचाकी स्लीप होऊन प्रा.डॉ.दिनेश भालेराव ठार झाले. तर वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. अनिल नन्नावरे वणी-वरोरा मार्गावरील सावर्ला येथे अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांना एसटी बसने धडक दिली. शिक्षण क्षेत्रात या दोघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात