शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

ट्रक अपघातात १६ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:00 IST

कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली.

ठळक मुद्दे१९ जखमी : पांढरकवडा बायपास चौफुलीवरील पहाटेचा थरार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली. या ट्रकचे चालक वाहक वाहन सोडून पसार झाले आहेत.मध्य प्रदेश आणि नागपूर येथून जनावरे घेऊन ट्रक (क्र.एम.पी.०९ - ८४१४) हैद्राबादकडे जात होता. सोमवारी पहाटे येथील पांढरकवडा चौफुलीवर ट्रकचालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक उलटला. यात ट्रकमधील १६ जनावरांचा तडफडून मृत्यू झाला. तर १९ जनावरे गंभीर जखमी झाली. घटनास्थळावर हृदय हेलावणारे दृश्य दिसत होते. जनावरांच्या प्रेतांचा सडाच रस्त्यावर पडला होता. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटे ६ वाजतापासून अपघातग्रस्त ट्रकमधून जनावरे बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.हटकर व डॉ.वटाणे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून जनावरांवर उपचार सुरू केले. नगरपरिषदेच्या मदतीने मृत जनावरे घटनास्थळावरून हलविण्यात आली.या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात प्राणीसंरक्षण कायद्यानुसार शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्तव्यावर असलेले सहायक निरीक्षक विनोद झळके यांच्यासह ठाणेदार यशवंत बावीस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देवून मदत कार्यास सुुरुवात केली.हप्तेखोरीच्या वादातून घडला अपघातजनावरे घेऊन जात असलेल्या ट्रकचा कळंबपासून आयटेन कार पाठलाग करीत होती. कत्तलीसाठी जाणाऱ्यां जनावरांना शहराबाहेर काढून देण्यासाठी काही टोळके राजरोसपणे हप्ते घेतात. एका ट्रिपला दहा ते वीस हजार रुपये आकारले जाते. हा ट्रक मडकोना येथून जात असताना या ट्रकमागे आयटेन कार लागली होती. यामध्ये काही तरुण चालकाला धमकावत होते. या धावपळीतच ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले तर पाठलाग करणारी आय-टेन कार गतिरोधकावर इंजीन आदळून जागेवरच बंद पडली. पोलिसांनी या कारच्या माध्यमातून तपास केल्यास रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.दारव्हा येथे ४७ जनावरांची सुटका, १२ अटकेत, २० लाखांचा मुद्देमालदारव्हा : जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणारी सहा वाहने पोलिसांनी पकडून ४७ जनावरांची सुटका तालुक्यातील हातोला येथे सोमवारी सकाळी ६ वाजता करण्यात आली. १२ जणांना पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारव्हा पोलिसांनी गोपनीय माहितीवरून हातोला येथे सोमवारी सकाळी सापळा रचला. त्यावेळी वाहनांची तपासणी केली असता सहा वाहनांमध्ये जनावरांची निदर्यपणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ४७ जनावरांची सुटका केली. तर आरोपी साहेबराव विठ्ठलराव इंगोले (५०), फकीर मोहंमद शेख चाँद, एयाज खान मिराज खान (३०) सर्व रा. उमर्डा बाजार ता. कारंजा, शेख इकबाल शेख नूर (२०) रा. लोही, शेख अजीज शेख बशीर (६५), नईम खान कासम खान (२६), कासम खान फकीर खान (७२), हारुन खान रशीद खान (३६), शेख अन्वर शेख गुलाब (४२), शेख शहजाद शेख गुलाब (२९), शेख इर्शाद शेख रऊफ (३४), अलिम खान कासम खान (३६) सर्व रा. लोही यांना अटक करण्यात आली. तर शेख असफाक शेख कादीर (४७) रा. लोही पसार झाला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार रिता उईके, पीएसआय संदीप मुपडे, संतोष माने, प्रेमसिंग चव्हाण, कासम निम्सुरवाले, रोशन गुजर, केशव मुंढे, संजय साबळे आदींनी केली.