शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

१५१ शाळांत व्यसनांचे सीमोल्लंघन

By admin | Updated: October 24, 2015 02:20 IST

सर्वत्र पारंपरिक पद्धतीने विजयादशमी साजरी होत असताना जिल्ह्यातील शाळांनी मात्र तंबाखूजन्य पदार्थांना हद्दपार करून आगळे सीमोल्लंघन साजरे केले.

‘अ‍ॅक्शन प्लॅन’चे फलित : महागाव, आर्णीची दमदार आगेकूचअविनाश साबापुरे यवतमाळसर्वत्र पारंपरिक पद्धतीने विजयादशमी साजरी होत असताना जिल्ह्यातील शाळांनी मात्र तंबाखूजन्य पदार्थांना हद्दपार करून आगळे सीमोल्लंघन साजरे केले. प्रशासनाने ठरवून दिलेल्या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’चा कित्ता गिरवत या नवरात्रीत तब्बल १५१ जिल्हा परिषद शाळांनी तंबाखूमुक्तीचे निकष पूर्ण केले असून जिल्ह्याची नंबर वनकडे वाटचाल सुरू केली आहे.शाळा आणि गावे तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन संयुक्तपणे प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षीपर्यंत केवळ १६ शाळा तंबाखूमुक्त करून जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला होता. रायगड जिल्हा मात्र १३५ शाळा तंबाखूमुक्त करून अव्वलस्थानी आहे. त्यामुळे यवतमाळला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात तंबाखूमुक्तीचे ११ निकष ठरवून देण्यात आले होते. हे निकष ९ दिवसांत पूर्ण करण्यासाठी एक ‘अ‍ॅक्शन प्लॅन’च ठरवून देण्यात आला होता. जिल्हा परिषद आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या या चळवळीचे समन्वयक म्हणून अवधूत वानखडे यांच्याकडे जबाबादारी देण्यात आली आहे. या नऊ दिवसांत अनेक आश्चर्यकारक आणि गमतीशीर बाबीही घडल्याचे वानखडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तंबाखूमुक्तीचे वेळापत्रक काटेकोरपणे राबविण्यात आर्णी पंचायत समितीअंतर्गतच्या तब्बल ४० शाळांना यश आले आहे, अशी माहिती सलाम मुंबई फाऊंडेशनचे अजय पिलाणकर यांनी दिली. तर महागाव पंचायत समितीमधील मुडाणा, कोठारी, पोखरी, उमरखेडमधील मार्लेगाव, विडूळ केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतर्फे लवकरच त्यांना अधिकृतरीत्या तंबाखूमुक्त घोषित करण्यात येणार असल्याचे वानखडे यांनी सांगितले.दरम्यान, येत्या बालक दिनापर्यंत म्हणजेच १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा १०० टक्के तंबाखूमुक्त करून दाखवा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व पंचायत समित्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने कामही सुरू करण्यात आले आहे.