शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेत १५ कोटींचा गैरव्यवहार; पाच वर्षांत सहा प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 20:21 IST

साडेअकरा कोटींची वसुली बाकी : वसुली चार कोटींची, फौजदारी कारवाईत चालढकल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा शाखेत तब्बल १४ कोटी ८४ लाख दोन हजार ९०० रुपयांचा गैरव्यवहार आणि अफरातफर झाली आहे. काही प्रकरणांत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. मात्र, अजूनही अनेकांवर फौजदारी कारवाई झाली नाही. गैरव्यवहार करणाऱ्यांकडून केवळ तीन कोटी ७५ लाख ९ हजार ६५४ रुपयांचीच रिकव्हरी आहे. बँक प्रशासन ठोस कारवाई करीत नसल्याने घोटाळे थांबणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिग्रस तालुक्यातील कलगाव आणि पुसद तालुक्यातील जांब बाजार शाखेतील गैरव्यवहार सध्या चांगलाच गाजत आहे. या ठिकाणी बँकेकडून लेखापरीक्षण करण्यात आले. कलगाव शाखेत सुमारे ७८ लाखांचा गैरव्यवहार चौघांनी केल्याचा अहवाल एजन्सीने सादर केला. त्यानंतर निलंबन करून संचालक मंडळाच्या बैठकीत फौजदारी कारवाईचा ठरावही घेण्यात आला. परंतु, अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली नाही. येथील सचिवाचेही निलंबन केले आहे. जांब बाजार शाखेत पाच कोटींच्या वर गैरव्यवहार झाला असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले. येथील गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने पुन्हा लेखापरीक्षण केले जात आहे. याचा अहवाल प्राप्त होताच अपहाराची निश्चित रक्कम समोर येणार आहे.

दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

  • एकूणच शेतकऱ्यांच्या बँकेतील रकमेवर दरोडा घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई अपेक्षित होती. परंतु, रिकव्हरीच्या नावावर चुटपूट रक्कम भरून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सहकार वर्तुळात आहे.
  • गत बैठकीत फौजदारीवरून काही संचालक आक्रमकही झाले होते. रक्कम भरली म्हणून कारवाई करायची नाही का, असा सवालही काही संचालकांनी केला होता. त्यानंतरही प्रशासन भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

साडेअकरा कोटींची वसुली बाकीसहा शाखेत एकूण १४ कोटी ८४ लाख दोन हजार ९०० रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. यातून आर्णी ३६ लाख ७४ हजार ८५८, हिवरा सोसायटी कर्ज ८९ लाख ७५ हजार ३९४, हिवरा २२ हजार १००, दिग्रस एक कोटी २४ लाख १७ हजार ६५८, कलगाव ३२ लाख ३८ हजार ८४४ आणि जांब बाजार प्रकरणात २४ लाख ३० हजार ८०० रुपयांची वसुली केली आहे. उपदान, पगार, सुरक्षेचे एकूण ८८ लाख ४४ हजार ९९४ रुपये आहेत. अजूनही ११ कोटी ५२ लाख ९८ हजार १६७ रुपयांची वसुली बाकी आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ