लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करण्यासाठी शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिबिराला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी यवतमाळात झालेल्या शिबिरात १४० शिक्षकांचे पे-फिक्सेशन करण्यात आले.माध्यमिक शिक्षण विभागातर्फे येथील अँग्लो हिंदी शाळोत सोमवारी व मंगळवारी असे दोन दिवस तालुकास्तरीय शिबिर पार पडले. तालुकाभरातून यावेळी ३९४ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी १४० जणांचे पे-फिक्सेशन पूर्ण झाले. ही प्रक्रिया मुख्य लेखाधिकारी यू. डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात लेखाधिकारी देवळे व फाटकर यांनी पार पाडली. या शिबिरात शिक्षक आघाडीचे अध्यक्ष रत्नाकर सिंगन, कार्याध्यक्ष किशोर बनारसे, प्रशांत पंचभाई, भूमन्ना बोमकंटीवार, पांडुरंग साखरकर, भगत, गौरकार, अविनाश रोकडे उपस्थित होते. यवतमाळ तालुक्यातून ९५० प्रस्ताव येणे अपेक्षित असताना ३९४ प्रस्ताव शिबिरात आले. त्यामुळे उर्वरित शिक्षकांचे पे-फिक्सेशन एप्रिलमध्ये सर्व तालुकास्तरीय शिबिर आटोपल्यानंतर करण्यात येणार आहे. यवतमाळपूर्वी झरी, मारेगाव आणि नेर तालुक्याचे शिबिर पार पडले. त्यात झरी ११७, मारेगाव ११६ तर नेर तालुक्यातील २१६ शिक्षकांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले.
शिबिरातून १४० शिक्षकांची वेतननिश्चिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 21:51 IST
सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करण्यासाठी शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिबिराला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी यवतमाळात झालेल्या शिबिरात १४० शिक्षकांचे पे-फिक्सेशन करण्यात आले.
शिबिरातून १४० शिक्षकांची वेतननिश्चिती
ठळक मुद्देसातवा वेतन आयोग : उर्वरित शिक्षकांना एप्रिलनंतर संधी