शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलिसांच्या दिमतीला १४ हजार होमगार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 15:14 IST

मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी दिलासा देत कायमस्वरूपी गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकायमस्वरूपी उपलब्धीनिवडणूक, सण-उत्सवाच्या बंदोबस्तात होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी दिलासा देत कायमस्वरूपी गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.एकूण १४ हजार ३४० होमगार्डची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ११ हजार १०० होमगार्ड प्रत्यक्ष उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय होमगार्डची संख्या निश्चित करून देण्यात आली आहे. त्यात यवतमाळ ४४०, बुलडाणा ५००, वाशिम १७०, अकोला ४४०, अमरावती ग्रामीण २९०, अमरावती शहर २४०, नांदेड व लातूर ५२०, हिंगोली २९०, परभणी २००, गोंदिया २८०, गडचिरोली २६०, भंडारा ३१०, चंद्रपूर ४२०, वर्धा ४००, नागपूर ग्रामीण १७०, नागपूर शहर २८०, जालना २५०, उस्मानाबाद ३७०, बिड ४००, औरंगाबाद ग्रामीण ३९०, औरंगाबाद शहर २४०, सोलापूर ग्रामीण ४००, सोलापूर शहर २४०, सांगली ५८०, सातारा ६४०, कोल्हापूर ७८०, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण प्रत्येकी ५००, अहमदनगर २९०, जळगाव ८५०, नंदूरबार ३३०, धुळे ३१०, नाशिक शहर व ग्रामीण प्रत्येकी ४४०, सिंधुदुर्ग १४०, रत्नागिरी १८० तर रायगड जिल्ह्याला ३४० होमगार्डची संख्या ठरवून देण्यात आली आहे. प्रत्यक्ष उपलब्ध करून देताना यात काही प्रमाणात कपात केली जाणार आहे. होमगार्डच्या समादेशकांना सर्व जिल्ह्यांना होमगार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश १३ आॅगस्ट रोजी जारी करण्यात आले आहे.दोन महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. याच काळात गणेशोत्सव, दुर्गोत्सव व अन्य सण-उत्सव राहणार आहे. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस खात्याला मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. मात्र प्रत्यक्षात मनुष्यबळाची टंचाई आहे. यावर उपाय म्हणून जिल्हानिहाय कायमस्वरूपी होमगार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.पोलीस भरतीची प्रतीक्षाचमहाराष्ट्र पोलीस मनुष्यबळाच्या कमतरतेला तोंड देत असले तरी अद्यापही पोलीस भरतीचा मुहूर्त महासंचालक कार्यालयाला सापडलेला नाही. ‘आधी लेखी परीक्षा व नंतर शारीरिक क्षमता चाचणी’ असे पोलीस भरतीचे नवे स्वरूप यावेळी राहणार आहे. त्या अनुषंगाने तरुणाई अभ्यासाला व मैदानावर तयारीला लागली आहे. परंतु पोलीस भरती नेमकी केव्हा होणार, किती जागांची होणार याबाबत काहीच स्पष्ट नसल्याने या तरुणांचे परिश्रम व्यर्थ ठरत आहे. हजारो तरुणांना या भरतीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Policeपोलिस