शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

26 मृत्युसह जिल्ह्यात 1237 नव्याने पॉझेटिव्ह, 660 जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 18:31 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 660 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात एकूण 26 मृत्यु झाले असून यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले आहे. मृतांपैकी चार जण यवतमाळ जिल्ह्याबाहेरील आहे. शुक्रवारी 1237 जण  नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 660 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मृतांमध्ये यवतमाळ येथील 36, 55, 47, 82, 51, 69 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 47 वर्षीय महिला व 61 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 80 वर्षीय पुरुष व दिग्रस तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 68 वर्षीय पुरुष, कळंब येथील 75 वर्षीय महिला, वणी येथील 75 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, नागपूर येथील 70 वर्षीय महिला, वरोरा येथील 65 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 55 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि.वाशिम) तालुक्यातील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये पुसद येथील 45 व 65 वर्षीय महिला, यवतमाळ येथील 59 वर्षीय महिला आणि देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष आहे.शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1237 जणांमध्ये 727 पुरुष आणि 510 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 431 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 107, पांढरकवडा 105, उमरखेड 98, कळंब 90, वणी 77, दिग्रस 69, मारेगाव 45, घाटंजी 41, आर्णि 31, बाभुळगाव 30, नेर 30, महागाव 22, झरीजामणी 20, दारव्हा 18, राळेगाव 9 आणि इतर शहरातील 14 रुग्ण आहे. शुक्रवारी एकूण 4929 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1237 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3692 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4987 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2430 तर गृह विलगीकरणात 2557 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 38524 झाली आहे. 24 तासात 660 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 32694 आहे. तर जिल्ह्यात एकूण 843 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.60 असून मृत्युदर 2.19 आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत 332184 नमुने पाठविले असून यापैकी 329833 प्राप्त तर 2351 अप्राप्त आहेत. तसेच 291309 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 577 बेडपैकी 558 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 19 बेड शिल्लक आहेत. दारव्हा येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 50 पैकी 14 बेड शिल्लक, पुसद येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 50 पैकी 37 बेड शिल्लक आणि पांढरकवडा येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 60 पैकी 20 बेड शिल्लक आहेत. तर जिल्ह्यातील 19 खाजगी कोव्हीड रुग्णालयांमध्ये 470 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 239 बेड शिल्लक आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसYavatmalयवतमाळ