शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

माफियांनी साठवून ठेवलेली १२ हजार ब्रास रेती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST

रेतीच्या व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने अनेकांंनी यात थेट गुंतवणूक केली आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. रेती घाटांवर दहशत ठेवण्यासाठी गुन्हेगारांनाही या व्यवसायात भागीदार म्हणून घेण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील रेतीच्या अर्थकारणामुळे यात अनेक जण सक्रिय सहभागी झाले आहेत. गुन्हेगार स्वत:चे पुनर्वसन रेतीच्या व्यवसायातून करीत आहे.

ठळक मुद्देमहसूल यंत्रणा ॲक्शन मोडवर : मुसक्या आवळणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील केवळ १२ रेती घाटांचा लिलाव झाला. या आडून ज्या घाटांचा लिलाव झाला नाही, ते सर्व घाट रेतीचा उपसा करून रिकामे करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी यवतमाळ शहरात चारही बाजूंनी जागा मिळेल तिथे रेतीचा साठा करण्यात आला. महसूल विभागाने घेतलेल्या ड्राईव्हमध्ये आतापर्यंत सुमारे १२ हजार ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. ६२ रेतीसाठे असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. असे आणखी साठे कारवाईच्या टप्प्यात आहेत. रेतीच्या व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने अनेकांंनी यात थेट गुंतवणूक केली आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. रेती घाटांवर दहशत ठेवण्यासाठी गुन्हेगारांनाही या व्यवसायात भागीदार म्हणून घेण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील रेतीच्या अर्थकारणामुळे यात अनेक जण सक्रिय सहभागी झाले आहेत. गुन्हेगार स्वत:चे पुनर्वसन रेतीच्या व्यवसायातून करीत आहे. आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर गुन्हेगार प्रशासकीय यंत्रणेलाच आव्हान देतो हा आजवरचा अनुभव आहे. तसाच प्रकार बुधवार १९ मे रोजी घडला. रेती माफियांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याला डांबून मारहाण करीत त्याचे व्हिडिओ व्हायरल केले. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी तत्काळ दोन नायब तहसीलदारांचे स्वतंत्र पथक तयार करून शहरात असलेेले रेती साठे सील करण्याची मोहीम हाती घेतली. आतापर्यंत जवळपास १२ हजार ब्रास रेती असलेले ६२ साठे सील करण्यात आले. यात नायब तहसीलदार अजय गौरकार व राजेश कहारे यांच्या पथकाने रेती माफियांना नोटीसही बजावल्या आहेत. २५ व २८ मे रोजी अवैध रेती साठ्याबाबत सुनावणी घेतली जाणार आहे. रेती साठ्याबाबत कायदेशीर परवानगी आहे का याची पडताळणी करून सुनावणीत निर्णय घेण्यात येणार आहे. खनिकर्म अधिकाऱ्यांकडून रेती साठ्याची अपसेट किंमत ठरवून त्याचा लिलाव  करून रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे.  

सील केलेली रेती चोरी जाण्याची भीती- महसूल प्रशासनाने यापूर्वीही अवैध रेती साठे सील केले होते. त्यावेळी रेती व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेऊन खटला दाखल केला. त्याचा निकाल लागला नाही. मात्र दरवर्षी या खटल्याच्या आड सील रेतीची विक्री करून तेथे पुन्हा नवीन रेती आणून ठेवली जाते. हाच प्रकार आता जप्त केलेल्या रेती साठ्याबाबत होण्याची भीती आहे. त्यामुळे जप्त केलेली रेती लिलावात विकून ही रक्कम शासन जमा ठेवावी, न्यायालयात खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्या रकमेबाबत निर्णय घ्यावा, अशी परवानगी महसूल विभागाकडून मागितली जात आहे.

 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार