शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भांडेगावात कावीळचे १२00 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:19 IST

तालुक्यातील भांडेगाव येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. आत्तापर्यंत सुमारे १२०० जणांना कावीळची लागण झाली असून अद्याप रोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही.

ठळक मुद्देगावकरी भयभीत : अद्याप नियंत्रण नाही

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील भांडेगाव येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. आत्तापर्यंत सुमारे १२०० जणांना कावीळची लागण झाली असून अद्याप रोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही.आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेऊन तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भांडेगाववासी कावीळशी झुंज देत आहे. सध्या रुग्ण संख्या बाराशेवर पोहोचली आहे. आरोग्य विभाग रुग्णांवर उपचार व रोगाच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अपयश आले. तीन हजार ७२३ लोकसंख्येच्या या गावात डिसेंबरपासून कावीळ साथ सुरू झाली.जानेवारीत रुग्णसंख्या पाचशेवर पोहोचली. सध्या बाराशे गावकऱ्यांना कावीळने ग्रासले आहे. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेला माहिती दिल्यानंतर एक डॉक्टर व परिचारिका गावात पाठवून उपचार सुरु केले. परंतु दिवसेंदिवस रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे उपाययोजना कुचकामी ठरली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर खऱ्या अर्थाने यंत्रणा कामाला लागली.आरोग्य सहसंचालक प्रदीप आहुते व पुणे येथील पाणी गुणवत्ता विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी वाघमारे यांनी भेट देऊन आरोग्य अधिकारी व गावकऱ्यांशी चर्चा केली. नंतर पुणे येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक आले. त्यांनी पाण्याचे नमुने घेतले. रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांच्या शौच व रक्ताचेही नमुने घेतले. पुणे येथील विषाणू संस्थेच्या डॉ.अनुराधा त्रिपाठी, डॉ.रानोडे व उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोषटवार यांनीही पाणी, शौच व रक्ताचे नमुने घेतले. दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाºयांच्या भेटी व आरोग्य विभागाच्या उपचारानंतरसुद्धा या रोगावर नियंत्रण मिळविता आले नाही.पाणीपुरवठ्याकडे यंत्रणेचे दुर्लक्षपिण्याच्या पाण्यातून ‘हिपेटायटिस ई’ हा व्हायरस शरीरात गेल्यास हा आजार बळावतो. भांडेगाव येथील काही रुग्णांच्या चाचणीत हा व्हायरस आढळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या साथीला पाणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते. तरीही पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण होत असल्याचे स्पष्ट आहे, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य