शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगावधान राखून यवतमाळातील व्यापाऱ्याने वाचवले १२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:26 IST

सोमवारी रात्री १२ लाखांची रोकड घेऊन यवतमाळ शहराच्या पाटीपुरा भागातील व्यापारी घरी जात असताना या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. लुटमार होण्याची चिन्हे दिसताच या व्यापाऱ्याने आपल्याकडील बॅग एका घरात सुरक्षितरीत्या फेकली. त्यामुळे ही रक्कम वाचली.

ठळक मुद्देयवतमाळातील युवक आर्णीत सक्रियदहा दिवसांपासून सुरू होता पाठलाग, लुटमारीची घटना टळली

हरिओम बघेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या पाटीपुरा भागातील तीन युवक लुटमारीच्या उद्देशाने आर्णीत सक्रिय झाले. सुमारे दहा दिवसांपासून त्यांनी आणीर्तील एका किराणा व पान मटेरियलच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवली. याची कल्पना त्या व्यापाऱ्याला आल्याने हा व्यापारी सावध होता. सोमवारी रात्री १२ लाखांची रोकड घेऊन व्यापारी घरी जात असताना या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. लुटमार होण्याची चिन्हे दिसताच या व्यापाऱ्याने आपल्याकडील बॅग एका घरात सुरक्षितरीत्या फेकली. त्यामुळे ही रक्कम वाचली. त्यानंतर या तीन युवकांना पकडण्यात आले.अक्रम घोरी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते आणीर्तील अमराईपुरा येथील रहिवासी आहेत. डोंगा कॉलनी भागात त्यांचे किराणा व पान मटेरियलचे दुकान आहे. दोन-तीन युवक मोटर सायकलने त्यांच्या मागावर असल्याची जाणीव त्यांना ७ फेब्रुवारीला झाली. संभाव्य धोका लक्षात आल्याने घोरी यांनी बाहेर जाताना सुरक्षेच्या दृष्टीने आपल्यासोबत नेहमी दोन जण ठेवण्याचे ठरविले. सोमवारी दुकान बंद करून ते मोटर सायकलने आपल्या दोन सहकाऱ्यांसह घराकडे जात होते. तेव्हा एका मोटरसायकलवरील तीन युवक त्यांचा पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या मोटरसायकलवरील नंबर प्लेटवर पांढरा रंग मारलेला होता. तीनही युवकांचा चेहरा कापडाने झाकला होता. संभाव्य धोका ओळखून त्यांनी आपल्याजवळील १२ लाखांची रोकड असलेली बॅग अमराईपुरा येथे घराच्या एरियात पोहोचताच ओळखीच्या एका घरात फेकली. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या या युवकांना पकडले. ७ फेब्रुवारीलासुद्धा पाठलाग करणारे हेच तीन युवक असल्याची खात्री त्यांना पटली. यावेळी झालेल्या गदीर्तील एकाने या तिघांपैकी एकाला ओळखले. तो यवतमाळच्या पाटीपुरा भागातील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान तीनही युवक पाटीपुरातील असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री ११ वाजता या युवकांना आर्णी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र ठाणेदार यशवंत बावीस्कर रजेवर असल्याने उपस्थित पोलिसांनी संशयित व तक्रारकर्त्यांना सोडून देऊन मंगळवारी येण्यास सांगितले. घटना घडली नाही, पैसे नेले नाही, मग गुन्हा कसा नोंदवायचा असा पोलिसांचा सूर होता. पोलिसांनी ठाण्यात आलेल्यांना समजूत घालून रवाना केले. अप्रत्यक्षरीत्या गुन्हा नोंदविणे टाळले जात होते. अशाच पद्धतीने आर्णीत गंभीर गुन्हे दडपले जात आहे. आणीर्तील व्यापाऱ्यांनी अक्रम घोरी यांना पोलिसात फिर्याद नोंदविण्याचा सल्ला दिला आहे. सर्व व्यापारी त्यासाठी सोबत असल्याची ग्वाहीही घोरी यांना दिली.आणीर्तील ही घटना सर्वच व्यापाऱ्यांनी सकाळी दुकानात येताना व रात्री घरी जाताना सावधता बाळगण्याचा संदेश देणारी ठरली आहे.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी