शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रस्त्यासाठी ११०० वृक्ष तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:03 IST

हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ-दारव्हा-वाशिम मार्ग : झाडावर मार्किंग, विकासासाठी निसर्गाची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे. सर्वाधिक निसर्गरम्य रस्ता अशी या रस्त्याची ओळख आता वृक्षकटाईने पुसली जाणार आहे.यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी मोजमाप सुरू झाले आहे. यवतमाळ, बोरी, दारव्हा, कुपटा मार्गे मंगरूळपीर असा हा ९४ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यात यवतमाळ ते बोरी अरबपर्यंत ११०० डेरेदार वृक्ष आहेत. यामध्ये वड, कडूनिंबाच्या झाडांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही झाडे ब्रिटिशकालीन आहेत.एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावरून प्रवास करावा असाच हा वैभवशाली रस्ता आहे. या रस्त्याचे मॉडेल संपूर्ण देशभरात अवलंबण्याची गरज आहे. तरी हे डेरेदार वृक्ष रस्ता रूंदीकरणात जमीनदोस्त होतील. त्याकरिता झाडांवर मार्किंग केली जात आहे. जामवाडीजवळील हेटीपर्यंत या वृक्षांची नोंद झाली. समोरची हद्द वनविभागाची आहे. त्यात दोन्ही बाजूंनी सागाचे वृक्ष आहे. त्यावर नोंद बाकी आहे. मात्र त्या झाडांनाही मार्किंग करून तोडले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गावकरी म्हणतात झाडे वाचवा, पण विकासही हवाचरस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडू नये, अशी मागणी गावांमधून होत आहे. मात्र त्यांची ही मागणी सरकारी यंत्रणा विकासाच्या नावावर नजरेआड करत आहे. वृक्षाची कटाई झाली तरी नव्याने वृक्ष लावले जातील, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या राज्य मार्गावरील तोडलेल्या वृक्षांची नंतर काय अवस्था झाली हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे वृक्षतोडीला पर्याय शोधण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. विकास आणि निसर्ग दोन्ही हवे आहेत, असेच ते म्हणत आहेत.वृक्ष पुनर्रोपण ही अवघड बाबयवतमाळातील मोठे वृक्ष तुटू नये म्हणून वृक्ष पुनर्रोपण करण्याचा प्रयोग हाती घेतला. मात्र मोजकीच झाडे ‘शिफ्ट’ झाली. इतर झाडे तुटलीच. आज प्रत्येक झाड महत्त्वाचे आहे. असे असताना वृक्ष तुटले तर पुन्हा असे वृक्ष उभे राहतील काय, हे सांगणे अवघड आहे.रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने अभियंत्यांना कळविले आहे. झाडे वाचविण्यासाठी ती पुनर्स्थापित केली जाईल. नाईलाजाने तुटली तर नव्याने झाडे लावले जातील.- धनंजय चामलवारअधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :highwayमहामार्गYavatmalयवतमाळ