शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

११ रणरागिणी करणार यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 14:35 IST

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य करण्यासाठी त्या ११ रणरागिणी सज्ज झाल्या आहेत.

ठळक मुद्देपहिल्यांदाच मिळाला बहुमान पुणे येथे ४५ दिवसांचे वाहनचालकाचे प्रशिक्षण पूर्ण

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिलांनी वाहन चालविणे हे आता नवलाईचं राहिलं नाही. वाहनच काय, विमान, रेल्वे या क्षेत्रातही महिला पुरुषांच्या बरोबरीने कामगिरी करत आहेत. यवतमाळ जिल्हा पोलीस दलात आतापर्यंत महिला वाहनचालक हे पदच नव्हते. जिल्हा पोलीस दलातील ११ महिला पोलीस शिपायांनी हे आव्हान स्वीकारले. वरिष्ठांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी वाहनचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी लागणारे प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले. आता जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य करण्यासाठी त्या ११ रणरागिणी सज्ज झाल्या आहेत.

पोलीस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण आहे. पुरुषांच्या बरोबरीने त्या पोलीस दलात प्रत्येक जबाबदारी पार पाडतात. इतकेच नव्हे तर काही महिला अधिकारी पोलीस शिपायांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसाही उमटविला आहे. जे पुरुषांनाही शक्य होत नाही, अशा काही बाबी महिलांनी घडवून आणल्यात. पोलीस दलातील वाहनचालक हे एकमेव पद महिलांच्याविना होते. आता त्यावरही महिलांनी दावा केला असून त्यासाठी त्या सक्षम असल्याचे स्वत:ला सिद्ध केले आहे.

पोलीस महासंचालकांनी ग्रामीण भागातील पोलीस दलातील महिला चालक निवडण्याबाबत प्रस्ताव मागितले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी हे प्रस्ताव सर्वच ३१ पोलीस ठाण्यात महिलांपुढे ठेवले. या प्रस्तावाला १५ महिला पोलिसांनी प्रतिसाद दिला. या १५ जणांचे अर्ज पोलीस चालक प्रशिक्षण शाळा औंध पुणे येथे पाठविण्यात आले. तेथे १५ पैकी ११ जणींची निवड झाली. त्यांनी ४५ दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. आता त्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कुठलेही वाहन चालविण्यासाठी सज्ज आहेत. या महिला चालकांना मोटर वाहन परिवहन विभागाचे पोलीस निरिक्षक राजेंद्र जाधव, सहायक फौजदार भानुदास उम्रतकर यांचे मार्गदर्शन लाभले.

दारव्हा ठाण्यातील अश्विनी कंटारे, माला वानखडे, यवतमाळ ठाण्यातील बबिता राठोड, प्रिया मुंदेकर, शुभांगी डेहनकर, निशादबी पठाण, ग्रामीण पोलीस ठाण्यातील दीपाली भेंडारे, नियंत्रण कक्षातील अलका कांबळे, बिंदू जोगळेकर, परिवहन विभागातील पूजा बनसोड या रणरागिणी आता जिल्हा पोलीस दलाच्या वाहनाचे सारथ्य करण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनPoliceपोलिस