शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

१०१ मद्यपी वाहनचालक ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

३१ डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत जिल्हाभर सर्वांनीच साजरे केले. या ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले गेले होते. कुणी सामूहिक तर कुणी थंडीमुळे घरातच थर्टी फर्स्ट साजरे केले. परंतु निरोप व स्वागताचा हा सोहळा शांततेत पार पडावा म्हणून कडाक्याच्या थंडीतही जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. ७१ पोलीस अधिकारी, ५७७ कर्मचारी व १६५ होमगार्ड तैनात करण्यात आले होते. एकीकडे सर्वजण नववर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना पोलीस मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत रस्त्यावर तैनात होते.

ठळक मुद्देथर्टी फर्स्ट : पोलिसांनी कडाक्याच्या थंडीत रात्र जागली, अडीच हजार जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नववर्षाच्या स्वागताचा सर्वत्र जल्लोष सुरू असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी मात्र जिल्हाभर कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य बजावत होते. पार्टी साजरी करून येणाऱ्या वाहनांची व चालकांची तपासणी केली गेली. त्यात दारू पिऊन जीवाची पर्वा न करता वाहन चालविणारे १०१ चालक पोलिसांनी ट्रॅप केले. त्यांच्यावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.३१ डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत जिल्हाभर सर्वांनीच साजरे केले. या ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले गेले होते. कुणी सामूहिक तर कुणी थंडीमुळे घरातच थर्टी फर्स्ट साजरे केले. परंतु निरोप व स्वागताचा हा सोहळा शांततेत पार पडावा म्हणून कडाक्याच्या थंडीतही जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. ७१ पोलीस अधिकारी, ५७७ कर्मचारी व १६५ होमगार्ड तैनात करण्यात आले होते. एकीकडे सर्वजण नववर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना पोलीस मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत रस्त्यावर तैनात होते. या काळात वाहन तपासणी, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना समज, चालण्याच्याही स्थितीत नसलेल्यांना घरापर्यंत सोडणे आदी कर्तव्ये पोलिसांनी पार पाडली.कुटुंबाचा विचार करा, दारू पिऊन वाहन चालवू नका, नववर्षाचे स्वागत करा, परंतु नियम व कायद्यात राहून असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अनिल किनगे आदींनी जनतेला केले होते. मात्र काहींनी या आवाहनाला फाटा देत दारू पिऊन वाहन चालविणे सोडले नाही. पोलिसांनी जिल्हाभर केलेल्या या तपासणीत तब्बल १०१ वाहन चालक दारू पिऊन असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आली.१५१ ठिकाणी नाकाबंदीजल्लोष साजरा करण्यासाठी पहाटे ५ वाजेपर्यंतची सूट प्रशासनाने दिली होती. मात्र कुणीही स्वैराचार करू नये यासाठी २९ डिसेंबरपासूनच वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली. तर पोलीस ठाणे स्तरावर ३१ डिसेंबरला १५१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी जिल्ह्यात दोन हजार ७६९ जणांविरूद्ध मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई केली.१९३८ वाहनांची तपासणीयावेळी पोलिसांनी एक हजार ९३८ वाहनांची तपासणी केली. त्यासाठी १५१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यवतमाळ शहरात सर्वाधिक नाकाबंदी लावली होती. मद्य पिऊन गाडी चालविणाºया १०१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. मुंबई पोलीस कायदा व इतर कायद्यांतर्गत दोन हजार ५१७ जणांवर कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतुकीच्या १५१ केसेस केल्या. दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या तिघांविरूद्ध कारवाई केली. दारूबंदी अधिनियमानुसार चार जणांविरूद्ध कारवाई केली. जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा व प्रत्येक पोलीस ठाणेस्तरावरच्या अधिकारी, कर्मचाºयांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.सर्वकाही शांततेतमंगळवारी रात्री ठिकठिकाणी पार्ट्या झाल्या, मोठ्या प्रमाणात मद्य रिचविले गेले, मात्र नववर्षाच्या या स्वागताला जणू पोलिसांचे सुरक्षा कवच लाभले होते. पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रभर थंडीतही रस्त्यावर होते. त्यामुळेच कुठे काही भानगड उद्भवली नाही. पर्यायाने मावळत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाच्या स्वागताचे ठिकठिकाणचे सोहळे व जल्लोष अगदी शांततेत पार पडले. त्याचे श्रेय पोलिसांना दिले जाते.

टॅग्स :Policeपोलिस