लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थी आणि युवकांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाने (एसआयओ) आपले विद्यार्थी घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. त्यातील विशिष्ट शिफारशी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक घोषणापत्रात कराव्या. प्रामुख्याने सरकारी नोकरीत अल्पसंख्यकांना दहा टक्के आरक्षण द्यावे ही बाब नमूद करावी, असे मत एसआयओने मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.एसआयओच्या घोषणापत्रात अल्पसंख्यकांसाठी मौलाना आझाद फेलोशीप, वंचित समाजासाठी (एससी, एसटी) राजीव गांधी फेलोशीपच्या रकमेत वाढ करावी, फेलोशीपच्या लाभासाठी एनईटीच्या अटी-शर्ती रद्द कराव्या, शिष्यवृत्ती योजनात सुधारणा, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य योजना सुरू करावी आदी बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्या आणि शिफारशी शिक्षण, युवा आणि मानवी अधिकार या मुद्यांवर आधारित असल्याचे यावेळी सांगितले. शिक्षणाचा अधिकार कायदा (आरटीई) अंमलबजावणीत अपयश मिळाल्याने केंद्र आणि राज्य सरकारचा निषेधही या घोषणापत्राच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचे यावेळी सांगितले.निवडणूक घोषणापत्रात विशिष्ट बाबींची शिफारस केली जावी, असेही यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्रात केंद्रीय विद्यापीठ स्थापन करावे, अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीची शाखा म्हणून महाराष्ट्रात अभ्यास केंद्र सुरू करावे, एआयआयएमएससाठी नागपूर येथे जागा वाढून २०० कराव्या, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवाव्या, निवडणूक प्रक्रिया उत्कृष्ट आणि पारदर्शक व्हावी, मानव अधिकाराचे संरक्षण आणि अस्तित्वाची जपणूक करणाऱ्या संस्थांना अधिक मजबूत आणि सक्षम करावे, सार्वत्रिक क्षेत्रात अल्पसंख्यांकांसोबत धार्मिकदृष्टीने होणारे भेदभाव संपविण्यासाठी अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनविण्यात यावा, असे यावेळी सांगितले.एसआयओचे जिल्हाध्यक्ष जियाउर रहमान, मीडिया सचिव तौसिफ जाफर खान, शहर अध्यक्ष अ. मलीक तहसीन, शहर सचिव फुरकान खान, नवेद शेख आदींच्या उपस्थितीत विद्यार्थी घोषणापत्र जाहीर करण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मुस्लीम अल्पसंख्यकांना हवे दहा टक्के आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:16 IST
विद्यार्थी आणि युवकांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाने (एसआयओ) आपले विद्यार्थी घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. त्यातील विशिष्ट शिफारशी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक घोषणापत्रात कराव्या.
मुस्लीम अल्पसंख्यकांना हवे दहा टक्के आरक्षण
ठळक मुद्देशासकीय नोकऱ्यांसाठी ‘एसआयओ’चा अजेंडा : राजकीय पक्षाच्या निवडणूक घोषणापत्रातून शिफारसीची मागणी