शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

यवतमाळात डझनांवर कुंटणखान्यांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

अवैध व्यवसाय आणि माफियाराज यातून मोठ्या प्रमाणात पैसा उभा होतो. शहरात सध्या या दोन्ही घटकांंना चांगलाच ऊत आला आहे. सहज मिळालेला पैसा माणसाला चंगळवादाकडे घेऊन जातो. सहाजिकच रात्र अन् दिवस यातील फरक समजत नाही. यंत्रणेतून अप्रत्यक्ष अभय असल्याने देहव्यापारामध्ये अनेकांनी गुंतवणूक सुरू केली. तितकाच रग्गड ग्राहकही शहरात मिळत असल्याने त्यांची हौस पुरविण्यासाठी नवनवीन सावज टिपले जात आहे.

ठळक मुद्देपॉश वस्त्यांमध्ये चालतो व्यवसाय : शहराचे सामाजिक स्वास्थ्य आले धोक्यात

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महानगरातही चालत नसेल इतका मोठा देहव्यापार यवतमाळ शहरात सुरू आहे. डझनांवर कुंटणखाने गल्लोगल्लीत थाटले गेले आहे. यातून होणारी आर्थिक उलाढाल सर्वांनाच स्तब्ध करणारी आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, कुटुंबातील समस्याग्रस्त स्त्रिया यांना या व्यवसायात ओढले जात आहे. याचे गंभीर परिणाम येत्या काळात सामाजिक स्वास्थ्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.अवैध व्यवसाय आणि माफियाराज यातून मोठ्या प्रमाणात पैसा उभा होतो. शहरात सध्या या दोन्ही घटकांंना चांगलाच ऊत आला आहे. सहज मिळालेला पैसा माणसाला चंगळवादाकडे घेऊन जातो. सहाजिकच रात्र अन् दिवस यातील फरक समजत नाही. यंत्रणेतून अप्रत्यक्ष अभय असल्याने देहव्यापारामध्ये अनेकांनी गुंतवणूक सुरू केली. तितकाच रग्गड ग्राहकही शहरात मिळत असल्याने त्यांची हौस पुरविण्यासाठी नवनवीन सावज टिपले जात आहे. यात दलाल, कुंटणखाना चालविणाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. आर्थिक लालसेतून ही मंडळी कुणाचे तरी शोषण करतात. अप्रत्यक्षरीत्या याला अभय देणारेही या शोषणकर्त्यांच्याच रांगेत मोडतात.या कुंटनखाण्यांची चर्चा सर्वत्रजामनकरनगर परिसरात बाली (काल्पनिक नाव) हिचा अनेक वर्षांपासून कुंटणखाना चालविण्याचा व्यवसाय आहे. सर्वश्रृत असूनही आजपर्यंत तिला थांबविण्यासाठी किंवा प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न झाला नाही. दारव्हा मार्गावरील ज्या जसराणा अपार्टमेंटमध्ये उषा (काल्पनिक नाव) हिच्या कुंटणखान्यावर धाड घालण्यात आली. त्याच्यावरच सुनीता (काल्पनिक नाव) हिचा कुंटणखाना सुरू आहे. त्याकडे मात्र दुर्लक्ष केले.शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पेशवे प्लॉट परिसरामध्ये संगीता (काल्पनिक नाव) हिच्या कुंटणखान्याचे अनेक नामचीन दर्दी आहेत. पिंपळगाव बायपासवर बालाजी मंगल कार्यालयामागील परिसरात श्वेता (काल्पनिक नाव), विठ्ठलवाडी परिसरामध्ये रोशनी (काल्पनिक नाव), बालाजी मंगल कार्यालय परिसरातील एका संस्थेजवळ राहत्या घरी मोठा ‘ठिकाणा’ आहे. मैथिलीनगर परिसरात रेल्वे क्रॉसिंगलगत योगिताने (काल्पनिक नाव) आपला डेरा थाटला आहे.जांब रोडवर राहूल आणि नुकताच रेकॉर्डवर आलेल्या जितू यांचे दोन स्वतंत्र अड्डे आहेत. सध्या जितू फरारीत आहे. धामणगाव रोडवरील गिरजानगर परिसरात सुनीतानेही (काल्पनिक नाव) देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आॅन कॉल सुविधा देण्यामध्ये ज्योती (काल्पनिक नाव) पुढे आहे. एकंदरच दहा किलोमीटर परिसरात वसलेल्या यवतमाळात अनेक महिला-मुली या व्यवसायात प्रत्यक्षरीत्या गुंतलेल्या आहेत.अमरावतीचा रोशन विदर्भातील कुंटणखान्याचा ‘पुरवठादार’अमरावतीच्या नवाथे प्लॉट परिसरात राहणाºया रोशनचे कारनामे संपूर्ण विदर्भातच आहे. तो मुली व महिलांचा कुंटणखान्यावर पुरवठा करतो. त्याचे आंतरराज्यीय कनेक्शन असल्याने या कुंटनखाण्यासाठी नवनवीन मुली-महिला पुरवून दलाली उकळण्याचे काम तो करतो. त्याच्या खालोखाल जितूनेही आपले नेटवर्क उभे केले आहे. हे सर्व यंत्रणेतील महाभागांच्या संपर्कात आहे. मात्र आजपर्यंत त्यांना कुणीच रेकॉर्डवर घेण्याचा प्रयत्न केला नाही.