शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

Sushant Singh Rajput Suicide: WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 11:28 IST

WWE स्टार जॉन सीनानं बॉलिवूड दिग्गज रिषी कपूर आणि इरफान खान यांनाही श्रद्धांजली वाहिली होती.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका पडद्यावर हुबेहूब साकारणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं रविवारी राहत्या घरी  आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच क्रीडाविश्वामध्येही दु:खाची लाट पसरली. कोणत्याही खेळाडूला सुशांतच्या अशा अचानक जाण्याच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीए. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेक दिग्गजांनी सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली वाहिली. WWE सुपरस्टार जॉन सीनानंही त्याला श्रद्धांजली वाहिली.

OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!

पवित्र रिश्ता या मालिकेनंतर काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुशांतनं अनेक हिट चित्रपट दिले.  धोनीच्या बायोपिकमधील त्याच्या भूमिकेचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं. भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्तेचे वृत्त कळताच धक्का बसला. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. त्याचा परिवार आणि मित्रांना या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी शक्ती मिळो.’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याने मी स्तब्ध आणि दु:खी आहे. तो खूप युवा व अत्यंत गुणवान अभिनेता होता. त्याच्या परिवार, मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.

WWE स्टार जॉन सीना यानेही सोशल मीडियावरून सुशांतला श्रद्धांजली वाहिली. त्यानं सुशांतचा फोटो पोस्ट करून ही श्रद्धांजली वाहिली.  यापूर्वी सीनानं बॉलिवूड दिग्गज रिषी कपूर आणि इरफान खान यांनाही श्रद्धांजली वाहिली होती.  अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, माजी नेमबाज राज्यवर्धन राठोड, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल. क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती यांनीही सोशल मीडियाद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतWWEडब्लू डब्लू ई