शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

The Undertaker Retirement : अंडरटेकर अन् केन यांच्यात खरंच होतं का रक्ताचं नातं?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 12:58 IST

अंडरटेकरचं खरं नावही अनेकांना माहित नसेल...

WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. पुन्हा रिंगमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे अंडरटेकरनं स्पष्ट केले. WWEनंही या वृत्ताला दुजोरा दिला. WWEचा सर्वात प्रामाणिक कर्मचारी म्हणून अंडरटेकर ओळखला जातो. 1990मध्ये त्यानं WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं. 55 वर्षीय अंडरटेकर तेव्हाचा सर्वात आघाडीचा कुस्तीपटू होता आणि त्यानं कारकिर्दीत अनेक जेतेपद जिंकली. अंडरटेकर आणि केन या भावंडांनी WWEमध्ये एककाळ गाजवला होता. पण, खरचं ही दोघं जुळी भाऊ होते?

मार्क विलियम कॅलवे असे त्याचं खरं नाव आहे.  1984म ध्ये त्यानं कुस्तीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. World Class Championship Wrestling (WCCW)  स्पर्धेसह त्यानं अनेक प्रमोशनल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. अंडरटेकरनं तीन वेळा लग्न केलं. 2010मध्ये त्यानं माजी कुस्तीपटू मिचेल मॅककूल हिच्याशी लग्न केलं. या दोघांना 2012मध्ये एक मुलगा झाला. तो त्याच्या कुटुंबीयांसह ऑस्टीन येथे राहतो. अंडरटेकरची पहिली पत्नी सारा यांचा मुलगा गनर व्हिंसेंट कॉलवे हाही WWEमध्ये येईल अशा चर्चा होत्या. पण तसे झाले नाही. अंडरटेकर WWEच्या एका वर्षासाठी 19 कोटी रुपये पगार घेतो, अशी चर्चा होती. WWE व्यतिरिक्त अंडरटेकरनं अनेक चित्रपटांत व मालिकांमध्येही काम केलं. 

Wrestlemaniaमधील यशस्वी खेळाडूंमध्ये अंडरटेकरचं नाव येतं. त्यानं सलग 21 Wrestlemania सामने जिंकले आहेत. त्याची ही विजयाची मालिका ब्रॉक लेसनरनं खंडीत केली.  त्यानंतर त्यानं पाच Wrestlemania सामन्यांत सहभाग घेतला. पण, त्याला रोमन रैगन्सकडून हार मानावी लागली. 2018च्या Wrestlemaniaसामन्यात त्यानं अवघ्या तीन मिनिटांत जॉन सीनाला चीतपट केलं. 

अंडरटेकर अन् केन खरंच जुळे भाऊ होते?WWEच्या इतिहासात अंडरटेकर आणि केन ही भावंड म्हणून ओळखली जायची. पण, खरं पाहता या दोघांमध्ये कोणतंच रक्ताचं नातं नाही. WWEमध्येच त्यांची भावंडांची भूमिका पार पाडली. केनचं खरं नाव हे ग्लेन जेकब्स असे आहे. WWEमध्ये केन व अंडरटेकर हे जुळी भावंड म्हणून ओळखली जायची, परंतु ही दोघं चांगले मित्र आहेत.  

टॅग्स :UndertakerअंडरटेकरWWEडब्लू डब्लू ई