शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'अंडरटेकर'वर कोसळला दुःखाचा डोंगर; मोठ्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 10:18 IST

अंडरटेकरनं सांगितली अखेरच्या सामन्यात सुरू असलेली मनातील घालमेल...

WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. पुन्हा रिंगमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे अंडरटेकरनं स्पष्ट केले. WWEनंही या वृत्ताला दुजोरा दिला. 1990मध्ये त्यानं WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं.  मार्क विलियम कॅलवे असे त्याचं खरं नाव आहे. अंडरटेकर त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या WrestleMania 36 सामन्याचे चित्रिकरणासाठी जात होता. पण त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचा मोठा भाऊ टिमॉथी याचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले.

Last Ride seriesच्या सामन्याच्या चित्रिकरणाच्या आदल्या दिवशी अंडरटेकरला भावाच्या निधनाची बातमी समजली. बोनयार्ड येथे सामन्याचे चित्रिकरण होणार होते आणि तेव्हा त्याला भाचीनं फोन केला. तिनं अंडरटेकरला त्याच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी दिली. अंडरटेकरचा भाऊ 63 वर्षांचा होता. 

अंडरटेकरनं सांगितलं की,''अखेरच्या सामन्यासाठी जाताना मला Voicemail मॅसेज आला आणि त्यात भाचीनं तिचे वडील आणि माझ्या भावाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. भावाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, असे मी तिला विचारले. तिनं मला सांगितले नाही त्यांचे निधन झाले आहे. WrestleManiaचा सामन्याचे चित्रिकरण संपवून मी माझ्या सर्व भावंडांना आणि आईला फोन करून ही दुःखद बातमी सांगितली.''

तो पुढे म्हणाला,''भावाचं निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रिकरणाला जाताना पाय जड झाले होते. ती माझ्या कारकिर्दीतील अखेरची मॅच होती आणि सर्वांचे लक्ष माझ्यावर केंद्रीत होते. रिंगमधील फाईटपेक्षा माझ्या मनात वेगळीच फाईट सुरू होती.'' अंडरटेकरच्या अखेरच्या सामन्याचे चित्रिकरण 8 तास चालले.

या आलिशान घरात राहणाऱ्या अंडरटेकरची संपत्ती कितीय माहित्येय? 

अंडरटेकर अन् केन यांच्यात खरंच होतं का रक्ताचं नातं?   

WWE सुपरस्टार 'अंडरटेकर' निवृत्त; त्याचं खरं नाव तुम्हाला माहित्येय?

टॅग्स :UndertakerअंडरटेकरWWEडब्लू डब्लू ई