शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळतेय शिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 11:43 IST

मोबाईल, संगणकाची सुविधा नसणारे विद्यार्थी याचा लाभ घेत असल्याचे चित्र कार्ली परिसरात दिसून येते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककार्ली ( वाशिम ): कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना गटा-गटाने शिकविले जात आहे. मोबाईल, संगणकाची सुविधा नसणारे विद्यार्थी याचा लाभ घेत असल्याचे चित्र कार्ली परिसरात दिसून येते. यंदा मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळाही बंद आहेत. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात  कोरोनाचे रुग्ण जास्त संख्येने आढळून येत असल्याने वर्ग नेमके केव्हा सुरू होतील, याबाबत अद्याप कोणतीही निश्चितता नाही. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. परंतू, ग्रामीण भागातील विशेषत: जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणक नसल्याने या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. आॅनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नसणाºया विद्यार्थ्यांना समुदाय पद्धतीने गावातील शाळा परिसर, समाजमंदिर, मोकळी जागा येथे शिकवावे, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कार्ली परिसरात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून आठ, दहा विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षण