शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

जि.प.कर्मचार्‍यांच्या बदल्या स्थगित

By admin | Updated: May 24, 2014 01:28 IST

वाशिम जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदल्या आज २३ रोजी ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या.

वाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदल्या आज २३ रोजी ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या. या बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षक वगळता सर्व कर्मचार्‍यांना आज सकाळी ११ वाजता जि.प.मधील स्व.वसंतराव नाईक सभागृहात बोलविण्यात आले होते. त्यानुसार मोठय़ा संख्येत कर्मचारी सभागृहात जमले असताना मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निवडणूक आयोगाने मार्गदर्शन मागवले असून, ते मिळेपर्यंत बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. जि.प.शिक्षकांचे समायोजन करण्यात आलेले नसल्याने शिक्षकांच्या बदल्या आधीच स्थगित करण्यात आल्या होत्या. उर्वरित कर्मचार्‍यांपैकी १३ कक्ष अधिकारी, २२ अधीक्षक, १३ विस्तार अधिकारी, ६२ वरिष्ठ सहायक, १६४ कनिष्ठ सहायक, २९३ ग्रामसेवक, तसेच १0१ आरोग्य सेवक, ४0 आरोग्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व जि.प.बांधकाम विभागातील अन्य विभागातील कर्मचार्‍यांपैकी त्या-त्या संवर्गानुसार कर्मचार्‍यांपैकी पात्र कर्मचार्‍यांच्या जागांच्या उपलब्धतेनुसार बदल्या केल्या जाणार होत्या. दरम्यान, २२ मे रोजी विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या बदल्यांची आज २३ रोजी आयोजित प्रक्रिया पार पडणार की नाही, याबाबत २२ रोजी सायंकाळपर्यंत संभ्रम होता; परंतु सायंकाळी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार या बदल्यांची प्रक्रिया आज २३ रोजी होणारच, असे सामान्य प्रशासन विभागातर्फे सांगण्यात आले. आज(दि.२३)रोजी स्व.वसंतराव नाईक सभागृहात या बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकतेने करण्यासाठी व्हाईटस्क्रीन व एलसीडी प्रोजेक्टर लावण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचार्‍यांसह व बदलीपात्र कर्मचारी मोठय़ा संख्येने जमले होते; परंतु अचानक बदल्यांची प्रक्रिया स्थगित झाल्यामुळे विनंतीवरुन बदल्या होण्याची अपेक्षा असणार्‍या कर्मचार्‍यांची प्रचंड निराशा झाली.