शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची मान्यता असलेले पाच ते आठवीचे वर्ग होणार पूर्ववत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:49 IST

जिल्हा परिषदेकडून मान्यता असलेले पाच ते आठवीचे वर्ग पूर्वीप्रमाणे सुरु राहणार असून तशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील इतर ठिकाणीदेखील सदर वर्ग सुरू करावे याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे यांच्याशी चर्चा केली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सरसकट इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग जोडण्यात आलेले असतील, असे वर्ग बंद करण्याबाबत कळविण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना सरसकट पाच ते आठवीचे वर्ग जोडण्यात आले होते. मध्यंतरी सदर वर्ग बंद करण्याबाबत कार्यवाही सुरु होती. दरम्यान आता जिल्हा परिषदेकडून मान्यता असलेले पाच ते आठवीचे वर्ग पूर्वीप्रमाणे सुरु राहणार असून तशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन २००९ अंतर्गत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याचे शासनावर बंधनकारक आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता १ ली ते पाचवीपर्यंत प्राथमिक व इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत उच्च प्राथमिक असा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. यानुसार चवथ्या वर्गाला पाचवा वर्ग जोडणे आणि सातव्या वर्गाला आठवा वर्ग जोडण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात काही ग्राम शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार काही शाळांमध्ये इयत्ता आठवी व पाचवीचे वर्ग सुरुही झाले होते. यासंदर्भात गतवर्षी शिक्षक, मुख्याध्यापक संघटनेने वाशिम जिल्ह्यातील इतर ठिकाणीदेखील सदर वर्ग सुरू करावे याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे यांच्याशी चर्चा केली होती. पाचवी व आठवीची वर्गजोड करण्यात आली तर शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढुन शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत व विद्यार्थ्यांना सुध्दा स्वगावी शिक्षण घेता येईल, हा मुद्दा शिक्षकांनी पटवून दिला होता. दरम्यान, त्यानंतर शिक्षण विभागातील वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सुचनेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सरसकट इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग जोडण्यात आलेले असतील, असे वर्ग बंद करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामुळे ही वर्गजोडची ही प्रक्रिया ठप्प होती. आता परत यामध्ये सुधारणा करण्यात आली असून, यापूर्वी जिल्हा परिषदकडून मान्यता असलेले पाचवी ते आठवीचे वर्ग पुर्वीप्रमाणेच सुरू राहतील, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा व प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी गटशिक्षणाधिकाºयांना दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीने योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा