शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी शाळा बचाव समित्या सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:04 IST

वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी काही शिक्षणप्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, जिल्हाभरात शाळा बचाव समित्या स्थापन केल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी काही शिक्षणप्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, जिल्हाभरात शाळा बचाव समित्या स्थापन केल्या जात आहेत. विद्यार्थी संख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शाळा वाचविण्यासाठी शाळा बचाव समित्या कार्य करणार आहेत.विविध कारणांमुळे काही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यामुळे या शाळांसमोर विद्यार्थी संख्या टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेषत: सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांची तसेच गोरगरीब पालकांची मुले अधिक संख्येने आहेत. त्यामुळे गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कायम राहिल्या पाहिजे, या उदात्त हेतूने शिक्षण प्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात शाळा बचाव समित्या स्थापन केल्या जात आहेत. यापूर्वी भटउमरा, सुरकंडी, सोमठाणा, उकळीपेन यासह अन्य काही गावांत शाळा बचाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शुक्रवार, २ आॅगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील तामसाळा, राजगाव येथे मान्यवरांनी भेटी देवून शाळा बचाव समितीचा उद्देश स्पष्ट केले. शिक्षणप्रेमी, शिक्षक, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था व गावकरी यांच्या समन्वय व सहकार्यातून जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकविण्याबरोबरच खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अधिकाधिक समाजाभिमुख व प्रगत कसा होईल यावरही यावेळी मंथन करण्यात आले. शनिवारी तोंडगाव यासह अन्य काही गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा