शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद,पंचायत समिती पोटनिवडणूक: ३१ जागांसाठी दाखल झाले केवळ ३८ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 12:25 IST

Zilla Parishad, Panchayat Samiti by-election : ५ जुलै ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून यादिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होऊ घातली असून येत्या १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, ३ जुलैअखेर जि. प.साठी पाच उमेदवारांनी १०, तर पं. स. साठी २६ उमेदवारांनी २८ असे केवळ ३८ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, ५ जुलै ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून यादिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्यांना दिले गेलेले आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याचा मुद्दा समोर करून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचे मान्य करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुढील दोन आठवड्यांत पोटनिवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासनासह इतरांच्या ११ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. सुनावणीअंती न्यायालयाने ४ मे २०२१ रोजी पुनर्विचार याचिका व स्थगिती मागणारे अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे पोटनिवडणूक होणारच यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार, जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. २९ जून ते ५ जुलै यादरम्यान उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. १९ जुलै रोजी मतदान आणि २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून अवघ्या १६ दिवसांनंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीत एकमेकांसमक्ष उभे ठाकलेल्या इच्छुक उमेदवारांकडून ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर विशेष भर दिला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

सोमवारी उमेदवारांची होणार गर्दीजि.प. व पं.स. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, ५ जुलै आहे.  ज्यांनी अर्ज सादर केलेला नाही, त्यांची  सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदElectionनिवडणूक