शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक शाळा एकशिक्षकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:58 IST

Education Sector News : राज्यात तब्बल ३ हजार ४६६ शाळा एकशिक्षकी असून, त्यात वाशिम जिल्ह्यातील २५ शाळांचा समावेश आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  शिक्षण विभागाने द्विशिक्षकी शाळांचे धोरण स्वीकारले असले, तरी राज्यात तब्बल ३ हजार ४६६ शाळा एकशिक्षकी असून, त्यात वाशिम जिल्ह्यातील २५ शाळांचा समावेश आहे.  केवळ शासनाचे धोरणच नव्हे, तर सामाजिक आणि भौगोलिक कारणांमुळे अनेक शाळा एकशिक्षकी झाल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.शासनाच्या मिशन ब्लॅक बोर्ड या उपक्रमांतर्गत नव्वदच्या दशकांत शाळा द्विशिक्षकी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु गेल्या काही वर्षांत शाळांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आकर्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शासकीय व मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे, तसेच अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न केल्यामुळे पुन्हा एकशिक्षकी शाळा निर्माण झाल्या. वाशिम जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांची संख्या १,४२०च्या वर आहे. त्यात प्राथमिक शाळांची संख्या लक्षणीय असून, गावागावांत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्याने, शासकीय मराठी शाळांतील विद्यार्थी संख्येत घट झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २५ शाळा एकशिक्षकी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यातील १० पेक्षा अधिक शाळांत विद्यार्थ्यांची पटसंख्या १० पेक्षाही कमी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत असून, सामाजिक व भौगोलिक कारणांमुळे या शाळा द्विशतकी करणे शक्य होऊ शकले नाही. 

इंग्रजी शाळांकडे कलगेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमांच्या शाळांत पाल्याचा प्रवेश करण्याकडे पालकांचा कल वाढला असून, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आकर्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शासकीय व मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे, तसेच अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न केल्यामुळे पुन्हा एकशिक्षकी शाळा निर्माण झाल्या.  

एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी करण्यात विविध अडचणी आहेत. त्यात पटसंख्या कमी असणे, तसेच शिक्षकांच्या निवृत्तीमुळे पदे रिक्त होणे, या प्रमुख अडचणी आहेत, शिवाय नवी शिक्षक भरतीही एवढ्यात झाली नाही. तथापि, पर्यायानुसार टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी करण्यात येतील.- गजाननराव डाबेराव, प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र