शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारानंतर सहा महिन्याने मिळते बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 15:55 IST

Washim ZP News वैद्यकीय उपचारानंतर चार महिन्याने देयक मिळत नसल्याचे दिसून येते.

 वाशिम : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारानंतर चार महिन्याने देयक मिळत नसल्याचे दिसून येते. कोरोनाकाळात तर देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला नसल्याने पेच निर्माण होत आहे.जिल्हा परिषदेत आरोग्य, शिक्षण (माध्यमिक/प्राथमिक), कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत, सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालकल्याण, बांधकाम, वित्त व लेखा, जिल्हा स्वच्छता मिशन कक्ष, जलसंधारण, यांत्रिकी विभाग असे १४ विभाग आहेत. या विभागांतर्गत येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांना वैद्यकीय उपचारानंतर वैद्यकीय देयकाची प्रतिपूर्ती केली जाते. यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या प्रस्तावाचा प्रवास तीन ते चार विभागातून होत असल्याने चार,  चार महिन्यांचा कालावधी लागतो. यंदा कोरोनामुळे शासनाकडून आवश्यक तेवढा निधीही मिळाला नाही.

बिले मिळत नसल्याच्या तक्रारीउपचारानंतर वैद्यकीय देयकाची प्रतिपूर्ती होण्यासाठी सर्वप्रथम संबंधित विभागात देयकाचा प्रस्ताव सादर करावा लागतो. तेथून तीन विभागाकडे प्रस्तावाचा प्रवास होतो. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होण्यास सहा महिन्यांपेक्षाही अधिक कालावधी लागतो, अशी तक्रार शिक्षकांच्या विविध संघटनांनी केल्या. त्याची दखल जि.प. प्रशासनाने घेणे कर्मचाऱ्यांना अपेक्षीत आहे.

संबंधित विभागाकडून वित्त व लेखा विभागात वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर निकाली काढण्यात येतो. मध्यंतरी कोरोनामुळे निधीचा प्रश्नही काही प्रमाणात होता. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके लवकर मंजूर केली जातात.-तुषार मोरेमुख्य लेखा व वित्त अधिकारी, 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद