शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक : स्वबळाचा नारा; इच्छूक उमेदवार लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:03 IST

इच्छूकांनी गॉडफादरसह मतदारांच्या गाठीभेटी घेतल्याने ग्रामीण भागात गुलाबी थंडीतही राजकारण चांगलेच तापत आहे.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशीही अर्थात २० डिसेंबरपर्यंत कोणत्याही पक्षाची युती किंवा आघाडी झाली नाही. प्रत्येकाने स्वबळाची तयारी करीत मित्रपक्षाकडून युतीचा प्रस्ताव येतो का यावर भर दिल्याने युतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दरम्यान, इच्छूकांनी गॉडफादरसह मतदारांच्या गाठीभेटी घेतल्याने ग्रामीण भागात गुलाबी थंडीतही राजकारण चांगलेच तापत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवरील अनिश्चिततेचे ढग दूर केले असून, नियोजित कार्यक्रमानुसार ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यावेळची जिल्हा परिषदेची निवडणुक विविध कारणाने चर्चेत आली आहे. गत २५ वर्षांपासून एकमेकांच्या हातात हात देऊन निवडणुकीला सामोरे जाणारे शिवसेना, भाजपा यावेळी एकमेकांपासून दूर झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसची धुरा सांभाळणारे माजी मंत्री अनंतराव देशमुख यावेळी जनविकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात आपले उमेदवार उतरवित आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युतीसंदर्भात अद्याप ठोस बैठक झाली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. युतीत शिवसेनेला सोबत घ्यायचे की नाही याबाबत मतभिन्नता असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. गतवेळी काँग्रेसला सर्वाधिक १७ जागेवर विजय मिळाला होता. त्याखालोखाल राकाँ व शिवसेना प्रत्येकी आठ जागेवर होते. यावेळची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छूक उमेदवार, पदाधिकऱ्यांमधून उमटत असल्यानेही काँग्रेस, राकाँ व सेनेच्या महायुतीवर प्रश्नचिन्ह लागत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडून काँग्रेसला अद्याप युतीसंदर्भात प्रस्ताव आला नसल्याचीही माहिती आहे. यासंदर्भात २१ डिसेंबर रोजी प्राथमिक टप्प्यात बैठक होऊ शकते, असेही काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. काँग्रेस, राकाँ, भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, जनविकास आघाडी याबरोबरच यावेळी नव्यानेच संभाजी ब्रिगेडही स्वतंत्रपणे जि.प. व पं.स. निवडणुकीत उतरत असल्याने चुरस निर्माण होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद